जॉली एलएलबीः कोर्टात कॉमेडीचा तडका

जॉली एलएलबी हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात देशभऱातील कोर्टातील कामकाज आणि वकिलांच्या कार्यशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. साधारणतः भारतातील कोर्टांमधील काम खूपच सुस्त पद्धतीने सूर असते आणि कोट्यवधी केसेस अजूनही पेंडिग आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 15, 2013, 08:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
चित्रपटः जॉली एलएलबी
दिग्दर्शकः सुभाष कपूर
संगीतः कृष्णा
मुख्यर कलाकारः अरशद वारसी, अमृता राव, बोमन ईरानी, सौरभ शुक्ला

जॉली एलएलबी हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात देशभऱातील कोर्टातील कामकाज आणि वकिलांच्या कार्यशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. साधारणतः भारतातील कोर्टांमधील काम खूपच सुस्त पद्धतीने सूर असते आणि कोट्यवधी केसेस अजूनही पेंडिग आहेत.
या चित्रपटाची कहाणी आणि पटकथेत तेवढी स्पष्टता दिसू येत नाही. मध्यांतराच्या पूर्वी काही असे सीन्स आहेत, की ते कथेसाठी बोजड आहेत. पण मध्यांतरानंतर चित्रपटात आलेलल्या रोचक वळणामुळे उत्सुकता निर्माण होते. कोर्टामध्ये जे चित्रीकरण करण्यात आले आहे, ते अत्यंत सुंदर असे आहे. विशेष म्हणजे न्याय प्रक्रियेत दिलेला कॉमेडीचा तडका अत्यंत धमाल उडवून देणारा आहे.

जॉली एलएलबीच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी न्यायप्रणाली आणि न्यायायलाच्या दुनियेवर कॅमेऱ्याला केंद्रीत केले आहे. या चित्रपटात काही असे छोटे-छोटे सीन दाखवले आहेत, की त्याद्वारे सामान्य माणसं कोर्टाची पायरी कशी चढतात आणि त्यांना कसा सामना करावा लागतो.
काय आहे जॉली एलएलबीची कहाणी
चित्रपटाची कहाणी एका केसच्या माध्यमातून पुढे सरकत जाणारी आहे. बडे बाप की बिगडी औलाद असलेला एक जण दारुच्या नशेत फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना गाडीने चिरडतो. त्याला वाचविण्यासाठी स्टार वकील राजपाल (बोमन इराणी) याला ही केस देण्यात येते. तो केसला वेगळ्या मार्गाने तोडून मोडून हे सिद्ध करतो की, मजुरांना कार नाही तर एका ट्रकने चिरडले आहे. त्यामुळे तो श्रीमंत बापाचा मुलगा वाचतो.

केसमध्ये बाजू मांडली जाते की, फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही आहे आणि फुटपाथवर झोपल्यावर मरण्याची जोखीम कायम राहते. दुसरीकडे सरकारी वकील दाखवलेला जगदीश त्यागी उर्फ जॉली (अरशद वारसी) म्हणे मांडतो की, फुटपाथ ही कार चालविण्यासाठीही नाही. या केसला तो जनहीत याचिकेद्वारे पुन्हा सुरू करतो. या द्वारे त्याला प्रसिद्ध वकील बनायचे असते. यानंतर ही केस अनेक लटके आणि झटक्यांसह संपूर्ण चित्रपटात चालते.

काय आहे प्लस काय आहे मायनस
कथानकात काही कमतरता आहेत. एका साक्षीदाराला पूर्णपणे विसरण्यात आले आहे. पण सुभाष कपूर यांनी लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका निभावली आहे. त्यांनी प्रत्येक कॅरेक्टर लिहण्यात चांगली मेहनत घेतली आहे. तसेच बारीकसारीक गोष्टीवर ध्यान दिले आहे. ज्या सहजपणे जॉली पुरावे शोधतो ते संपूर्ण कहाणीला कमजोर करून टाकते. चित्रपटात गाणे हे लांबी वाढविण्यासाठी टाकण्यात आले असल्याने कहाणीत व्यत्यय निर्माण करतात. हास्याची कारंजे, काही चांगली दृश्य, संवाद आपल्या रोचक वाटतील. दिग्दर्शकाच्या भूमिकेत सुभाष तांत्रिक दृष्ट्या काही खास करू शकले नाही तसेच कहाणी त्यांनी अत्यंत सपाट पद्धतीने मांडली आहे.
बोमन आणि अरशदचा अभिनय
चित्रपटात बोमन ईराणीने एका धूर्त वकिलाची भूमिका चांगल्या प्रकारे वठवली आहे. अरशदनेही बोमनला जबरदस्त टक्कर दिली आहे. यात त्याने ओव्हर अँक्टीपासून स्वतःला वाचविले आहे. सौरभ शुक्लाची भूमिका दाद देऊन गेली. तसेच अमृता राव पण आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरली आहे. जॉली एलएलबी अनेक त्रुटींसह मनोरंजन करण्यात आणि आपले म्हणणे मांडण्यात यश्सवी ठरला आहे.