राज्यातली कॉल सेंटर्स ATSच्या रडारवर

राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांचे वसतीगृह एटीएसच्या रडारवर आले आहेत. एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतीगृहातील सर्व मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलीसांवर सोपवली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आलेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2013, 11:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांचे वसतीगृह एटीएसच्या रडारवर आले आहेत. एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतीगृहातील सर्व मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलीसांवर सोपवली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आलेत.

दहशतवादी पुन्हा एकदा राज्यात सक्रीय होऊ पाहतायत...त्यांच्या या कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र एटीएसने ज्यातील सर्व कॉल सेंटर आणि वसतिगृहातील सगळ्या मुलांच्या नावांची छाननी करायला सुरुवात केली आहे.
कॉलसेंटरमध्ये कोण कोण मुलं काम करतात आणि वसतिगृहांमध्ये कोण राहत, त्याचबरोबर त्यांच्याकडे येणाऱ्या जाणा-यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एका स्पेशल एटीएस सेलची निर्मिती करण्यात आलीय. हा सेल थेट महाराष्ट्र एटीएसच्या संपर्कात असेल. याबाबत एटीएस सर्व खबरदारी घेत असल्याचं गृहमंत्री आर आर पाटलांनी सांगितलय.

यासीन भटकळ, मोहम्मद सिद्दी उर्फ शाहरुख़, असदुल्ला अख़्तर जावेद उर्फ डॅनियल उर्फ तरबेज, वकास उर्फ अहमद, आणि तेहसीन अख़्तर उर्फ मोनू उर्फ हसन हे चारही दहशतवादी गेली दोन वर्ष महाराष्ट्रात वेळवेगळ्या वसतिगृहांमध्ये राहात आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं, त्याठिकाणी पोलिस पोहोचलेही होते, पण त्याआधीच हे दहशतवादी पळण्यात यशस्वी झाले. अशीही माहिती मिळालीये की, कॉल सेंटर आणि वसतिगृहांच्या मुलांच्या मदतीने हे चौघेही इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेल तयार करतायेत. म्हणूनच अशा गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र एटीएसने राज्यातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वस्तीगृहांवर बारीक लक्ष ठेवण्याचं ठरवलंय.