www.24taas.com, मुंबई
आगामी चार वर्षात जग अगदी जवळ आल्या सारखं वाटणार आहे...कारण देशादेशातलं अंतर अवघ्या काही मिनिटांवर येवून पोहचणार आहे..२०१६ पर्यंत एव्हिएशन तज्ञ एक असं विमान तयार करणार आहेत. ज्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा तब्बल २० पट अधिक असणार आहे.ते विमान ताशी २४ हजार किलोमीटर या वेगाने धावणार आहे
माणसाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. पण जर प्रवासी विमान रॉकेटच्या वेगापेक्षा अधिक वेगाने धावलं तर काय होईल याचा कधी तुम्ही विचार केला आहे...नाही ना ? पण ही कल्पना आता वास्तवात उतरणार आहे...रॅकेटच्या वेगालाही लाजवेल असा विमानाचा वेग असणार आहे....जर तुम्हीही अशाच वेगवान विमानाचं स्वप्न बघीतलं असेल तर तुमचं ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे...त्या विमानामुळे जग असं काही बदलणार आहे की, केवळ एक दिवसात तुम्हाला अवघ्या जगाची सफर करता येणार आहे.....
मुंबई - दिल्ली केवळ एका मिनिटात ! साडे सात मिनिटांत दिल्ली ते सिंगापूर! 15 मिनिटांत मुंबई ते टोकियो ! 30 मिनिटांत दिल्ली ते न्यूयॉर्क ! जेव्हा ताशी 24000 किमीचा असेल वेग, तेव्हा जग आणखी जवळ येईल !
होय... ताशी २४ हजार किलोमीटरच्या वेग...तुम्हाला हा वेग अशक्यप्राय वाटत असला तरी या वेगाने झेपावणार विमान तयार करण्याची योजना विमान कंपन्यांनी बनवली आहे..विशेष म्हणजे ते विमान केवळ एक ते दिड तासात सगळ्या जगाला प्रदक्षिणा घालणार आहे..
अमेरिकेच्या संरक्षण खातं, नासा तसेच बोईंग आणि अन्य एका कंपनीच्या मदतीने एक खास विमान तयार करत आहे..त्या विमानाच्या मदतीने अमेरिका एका तासात आपले सैनिक जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात पाठवू शकणार आहे..तसेच तिथे आपले रणगाडे पाठवून त्यांना हल्लाही करता येणार आहे.
2016मध्ये झेपावेल हायपरसोनिक विमान.विमानाचं प्राथमिक डिझाईन तयार. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्यासाठी एका खास योजना आखली आहे...त्या योजने अंतर्गत ताशी २४ हजार किलोमीटर वेगाने धावणारं विमान तयार केलं जाणार आहे..त्याची तयारी अमेरिकेनं केली आहे....त्या विमानाच्या माध्यमातून अमेरिकेला जगात कोणत्याही देशात आपलं सैन्य पाठवून हल्ला करता येणार आहे..या प्रकल्पामध्ये काही खासगी कंपन्यांना सहभागी करुन घेण्यात आल्यामुळे त्या खास विमानसाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान प्रवासी विमानासाठी उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे..मात्र सुरुवातीचा काही काळ ते तंत्रज्ञान केवळ अमेरिकेच्या लढाऊ विमानासाठी वापरलं जाणार आहे...यापूर्वीही अशाच प्रकारे काही अमेरिकेच्या सैन्याने वापरल्यानंतर ते खासगी वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आलं आहे..त्यामुळे या विमानाच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..या सगळ्या पार्श्वभूमीवर आवाजाच्या वीस पट अधिक वेगाने धावणारं ते विमान कधी आकाराला घेणार आणि ते प्रत्यक्षात कधी टेकऑफ घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.