अभिनेता आमिर खानने ओढवून घेतलेले वाद

देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खानने नवीन वादाला तोड फोडलं असलं तरी यापूर्वीही आमिर खानने अनेक वेळा वाद ओढावून घेतले आहेत.आजवर कोण कोणत्या कारणामुळे आमिर वादात सापडला होता ते.

Updated: Nov 24, 2015, 09:34 PM IST
अभिनेता आमिर खानने ओढवून घेतलेले वाद title=

मुंबई : देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खानने नवीन वादाला तोड फोडलं असलं तरी यापूर्वीही आमिर खानने अनेक वेळा वाद ओढावून घेतले आहेत.आजवर कोण कोणत्या कारणामुळे आमिर वादात सापडला होता ते.

असंवेदनशील आणि विपर्यास असं आमिरने या सिनेमाचं वर्णन केलं होतं. त्यामुळे आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या शाब्दीक वाद रंगला होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिश्ट म्हणून जरी आमिर खानची ख्याती असली तरी अनेक वेळा त्याने वाद निर्माण केला आहे.

देशात असहिष्णुता वाढली आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडून जायचा विचार आपली पत्नी किरण राव करत असल्याची प्रतिक्रिया आमिर खाननं काल व्यक्त केली. तर दुसरीकडे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नीनं स्वत: सैन्यात जाण्याची इच्छा व्यक्त केलीय. आपली दोन्ही मुलंही सैन्यात गेलेली त्यांना आवडणार आहे. आता यातल्या कुणाला खरा हिरो मानायचं हे?

मेधा पाटकर आंदोलनाला समर्थन
एक संवेदनशrल अभिनेता म्हणून तो इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. मात्र देशातील सध्याच्या परिस्थितीवर त्याने केलेल्या वक्तक्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तसा  वादापासून चार हात दूर असलेल्या आमिर खानने अनेक वेळा वाद ओढावून घेतला आहे.त्याच्या रंग दे बसंती या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी असाच वाद रंगला होता. आमिर खानने मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाला समर्थन देत एकच खळबळ उडाली होती.

आमिरची लाज
तत्कालीन गुजरात सरकारने आमfरच्या रंग दे बसंतीच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. नर्मदा धरणामुळे विस्थापित होणा-यांच्या पुनर्वसानाचा मुद्दा आमिरने मांडला होता. विशेष म्हणजे या वादाचा फायदा आमिरच्या सिनेमाला झाला होता. पीके सिनेमामुळेही आमिर खान वादात सापडला होता. या सिनेमाच्या पोस्टरवर आमिरने आपली लाज झाकण्यासाठी केवळ एक ट्रान्झिस्टर वापरला होता.

शाहरुख कुत्रा
तारे जमीन पर सारखा संवेदनशील सिनेमा तयार करणा-या आमिरचं पीकेतील हे रुप पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आमिर खानने आपल्या कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवल्यामुळेही वाद निर्माण झाला होता. बॉलिवूडचा सुपर स्टार शाहरुख खानचा अपमान करण्यासाठी आमिरने मुद्दाम आपल्या कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होती.त्यावर खुलासा करतांना आपण विकत घेतलेल्या घरासोबत तो कुत्रा घरमालकाने आपल्याला दिला होता.आणि त्याचे नावही त्या घर मालकाने ठेवले होते असा दावा आमिरने केला होता. आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यतही बरेच वाद झाले आहेत. पहिली पत्नी रिनाशी घटस्फोट घेवून त्याने किरण रावशी लग्न केलं.

 परदेशी पत्रकार महिलेच्य प्रेमात
लगान सिनेमाच्या शुटिंग दरम्यान परदेशी पत्रकार जेसिकाशी आमिरची जवळीक वाढली आणि याच संबंधातून त्याला मुलंही झालं. मात्र आमिरने त्याचा इन्कार केला. आमिरचं हे प्रकरणही चांगलंच गाजलं होतं. दिग्दर्शक संजय लिला भन्साळीच्या ब्लॅक सिनेमाविषय़ी आमिर खानने केलेल्या वक्तव्यामुळेही आमिर वादात सापडला होता.
 
हिंदू सेनेच्या २५ कार्यकर्त्यांची निदर्शन...
दरम्यान, अभिनेता आमिर खाननं पत्नीला देश सोडून जावसं वाटत असल्याचं विधान केल्यावर आता त्याचाविरोधातला संताप वाढू लागलाय. सोशल मीडिया आणि इतरत्र येणाऱ्या प्रतिक्रिया बघता आमिर खानच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.  तर दसरीकडे आमिरच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घरासमोर निदर्शनं केली. निदर्शनं करणा-या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारावाईही केली आहे.  हिंदू सेनेच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

पाकिस्तानात जा : शिवसेना
आमिर खान ने केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते रामदास कदम जोरदार टीका केली. आमिरला सुरक्षिततेची एवढीच भीती वाटत असेल तर त्यान कुटुंबासह सरळ पाकिस्तानात राहायला जावं असा खोचक सल्ला कदम यांनी आमिरला दिलाय… तर काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमीरचं विधान अतिरेक असल्याचं म्हटलंय.. मात्र त्याच वेळी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी मौन सोडलं पाहिजे, असंही त्यांचं म्हणणं आहे... 

खरच स्थिती बिघडली आहे का?
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी मात्र आमीर खानच्या विधानावर थोडासा विरोधी सूर लावलाय. भारत हा विविध विचारसरणी असलेले नागरिक वास्तव्य करत असलेला देश आहे. आणि जर देशातील परिस्थिती खरच बिघडली असेल तर ती सर्वांनी मिळून सुधारण्याचा विश्वास सरकारनं दिला पाहिजे असं मत महेश भट्ट यांनी व्यक्त केलय. 

दरम्यान, सरसकट सगळ्यांना देशद्रोही ठरवण्यापेक्षा सरकारनं लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात असा सल्ला राहुल गांधींनी दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.