राज्यात अवैध खाणकामांचा वाढता आलेख

संपूर्ण देश धुळवड साजरी करत असतानाच मध्यप्रदेशमध्ये अवैध खाणकाम रोखताना आयपीएस अधिका-याची हत्या केली. झी रिसर्च ग्रृपनं अवैध खाणकाम प्रकरणांचा मागोवा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातही अवैध खाणकामांचा वाढता आलेख दिसून आला आहे.

Updated: Mar 9, 2012, 11:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

संपूर्ण देश धुळवड साजरी करत असतानाच मध्यप्रदेशमध्ये अवैध खाणकाम रोखताना आयपीएस अधिका-याची हत्या केली. झी रिसर्च ग्रृपनं अवैध खाणकाम प्रकरणांचा मागोवा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली.  महाराष्ट्रातही अवैध खाणकामांचा वाढता आलेख दिसून आला आहे.

महाराष्ट्राचा विचार करता २००६ मध्ये अवैध खाणकामाची ४,९१९ प्रकरणे समोर आली होती. २०११ मध्ये म्हणजेच पाच वर्षात त्यांची संख्या दुप्पट झाली. तब्बल १०,३४९ प्रकरणांची नोंद झालीये. आंध्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशची तुलना करता हे प्रमाण गंभीर आहे. २०११ मध्ये महाराष्ट्रात केवळ १३ प्रकरणांचाच पोलीस ठाण्यात एफआयआर आणि कोर्टात केस दाखल झाली आहेत.

महाराष्ट्र सरकारनं २०११ मध्ये अवैध खाणकाम करणा-यांकडून ७२ कोटींचा दंड वसूल केलाय. देशात २०११मध्ये तमीळनाडूत सर्वाधिक १०६१ एफआयआर नोंदले गेलेत. त्याखालोखाल कर्नाटक ११०६, गुजरात २८९, आंध्रप्रदेश १८, तर मध्यप्रदेशात सर्वात कमी ५ प्रकरणांची नोंद झालीये.

अवैध कामांचा वाढता आलेख

महाराष्ट्र

२००६ -  ४,९१९ प्रकरणांची नोंद

२०११ -  १०,३४९ प्रकरणांची नोंद

गुन्ह्यांची नोंद आणि खटले (२०११)

महाराष्ट्र - १३

तमिळनाडू - १०६१

कर्नाटक - ११०६

गुजरात - २८९

आंध्रप्रदेश - १८

मध्यप्रदेश - ५