3 मे 1913 चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय चित्रपटसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन...'राजा हरीश्चंद्र' हा सिनेमा मुंबईतल्या कॉरोनेशन थिएटरमध्ये झळकला आणि इथूनच भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंनी हा पहिला मूकपट तयार केला.
या काळात सिनेमा म्हणजे फक्त विरंगुळा नाही तर तो समाजाच्या जीवनाचा एक भाग झाला. अभिनेते स्टार झाले तेही याच काळात. स्टारडमची ख-यअर्थानं सुरुवातंही झाली तीही याच काळात
70 च्या दशकात राजेश खन्नाच्या अनेक फिल्म्स आल्या. मात्र याच वेळेला आणखी एक सुपरस्टार हिंदी सिनेसृष्टीला मिळाला तो म्हणजे अमिताभ बच्चन...बिग बींच्या रुपात एक अँग्री मॅन सिनेसृष्टीला मिळाला..यानंतर या महानायकाच्या साथीने हिंदी सिनेमामध्ये आशयघन फिल्मस पाहायला मिळाल्या.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.