पिंपरीतली मुलं खेळणार स्वीडनमध्ये फुटबॉल

आर्थिक स्थिती बिकट असतानाही पिंपरी-चिंचवडमधल्या काही होतकरू फुटबॉलपटूंना एक अनोखी संधी मिळाली. स्वीडनमधल्या एका आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळाल्याने ही मुलं हरखून गेली आहेत. हा अनुभव कधीही न विसरता येणारा आहे, अशी भावना ही मुलं व्यक्त करत आहेत.

Updated: Jul 29, 2012, 10:11 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

आर्थिक स्थिती बिकट असतानाही पिंपरी-चिंचवडमधल्या काही होतकरू फुटबॉलपटूंना एक अनोखी संधी मिळाली. स्वीडनमधल्या एका आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळाल्याने ही मुलं हरखून गेली आहेत. हा अनुभव कधीही न विसरता येणारा आहे, अशी भावना ही मुलं व्यक्त करत आहेत.

पिंपरी चिंचवडमधल्या महापालिकेच्या शाळेतली मुलं फुटबॉल खेळत आहेत. यातली बहुतांश मुलं झोपडपट्टीत राहतात. गरीबी असेल, मात्र या खेळानं या जिद्दी मुलांना लाखमोलाची मनाची श्रीमंती दिली आहे. यातला कोणी स्वतःला रोनाल्डो म्हणवतो, तर कोणी काका...याच जिद्दीतून या मुलांना एक अनोखी संधी लाभली. स्वीडनमधल्या ‘गोठीया आंतरराष्ट्रीय फुटबाल’ स्पर्धेत भाग घ्यायची संधी या हौशी खेळाडूंना मिळाली आणि त्यांचं मनातलं एक स्वप्नच जणू सत्यात उतरलं. पिंपरी चिंचवडमधल्या SKF कंपनीनं याकामी विशेष पुढाकार घेतला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळल्याचा आनंद आणि तितकाच बहुमोल अनुभव मिळाल्याने ही मुलंही खूष झाली आहेत. एरवी जगण्याची रोजची लढाई सुरूच आहे. कुणाचे वडील रोजंदारीवर काम करतात, तर कुणाचं अगदीच हातावरचं पोट...मात्र, याही परिस्थितीत जिद्द कायम आहे, ती फुटबॉलमध्ये शानदार कामगिरी करून नाव कमवायची...स्वीडनच्या स्पर्धेची ही अनोखी संधी मिळाल्यानं ही मुलं हरखून गेलीयेत.

स्वीडनमध्ये या मुलांना म्हणावं तसं यश मिळालं नाही..पण यापुढे आणखी कठोर मेहनत करण्याची जिद्द मात्र मिळालीये.