धुमसतं आसाम

आसाममध्ये आज जातीय दंगलीने डोकं वर काढलं असलं तरी गेल्या काही वर्षात या ना त्या कराणाने आसाम अशांत ठेवण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे आणि काही फूटीरवादी गट त्याला कारणीभूत आहेत.

Updated: Jul 26, 2012, 11:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आसाममध्ये आज जातीय दंगलीने डोकं वर काढलं असलं तरी गेल्या काही वर्षात या ना त्या कराणाने आसाम अशांत ठेवण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे आणि काही फूटीरवादी  गट त्याला कारणीभूत आहेत.

 

1826 च्या यंडोबा करारानंतर ब्रम्हदेशाशी विभक्त होऊन भारताला मिळालेला भूभाग म्हणजे आसाम.. म्यानमार हल्लेखोरापासून ते आज बोडो अतिरेक्यापर्यंत या निसर्गरम्य वारसा सांगणा-या प्रदेशानं नेहमीच अशांततेची झळ सोसलीय. आसाममधल्ये तब्बल 11 जिल्हे आज जातीयवादाच्या आगीत धुमसत आहेत..

 

आसाममधली सर्वात बांगलादेशींची घुसखोरी हेच आज या संपुर्ण अशांततेच कारण बनलंय. भौगोलिक अडचण आणि त्याच वेळी घुसखोरांना हटवण्यासाठी केंद्राने केलेल्या कायद्यातली पळवाट यामुळे स्थानिकांचा बांगलादेशी लोंढ्यावर संताप आहे. सत्तरच्या दशकात लोअर आसामच्या धुबरी, गोलपाडा, कोकराजार, मोरीगाव, व नवगाव जिल्ह्यामध्ये घुसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर  प्रस्थापित राजकिय पक्ष काहीच करत नाही म्हटल्यावर 1980 च्या दशकात आसाममधील विद्यार्थ्यानी ऑल आसाम स्टुडंटस युनियनच्या नेतृत्वाखाली घुसखोरी रोखण्यासाठी प्रखर आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर  आसाम करार करण्यात आला.. पण या कराराचे प्रामाणिक पालन झालच नाही आणि वाद उफाळतच गेला...

 

आज आसामकडे जरी जातीयवाद हिसांचाराचे नाव देऊन लक्ष वळवण्यात येत असलं तरी दहशतवाद्यांनी आसामला सॉफ्ट टार्गेट ठरवल्याचे गेल्या काही वर्षातल्या कारवायावरुन स्पष्ट झालय..भूतान, तिबेट, म्यानम्यार, आणि बांगलादेश यांच्या सिमेवर असलेला इशान्य भारताचा हा प्रदेश दहश
तवाद्यांनी संवेदनशील बनवलाय..प्रथम घुसखोरी करायची आणि नंतर त्या प्रदेशाचा लचका तोडायचा या आयएसआयच्या खेळीमुळे केवळ आसाममध्येच आज वीस जिहादी गट छुपे कार्यरत आहेत..

 

इशान्य भारतीयांच्य प्रश्नांबद्दलची सरकारी उदासिनता हे या सर्वामागचे मुख्य कारण असल्याचं इतिहासाकडे निरखून पाहिल्यास स्पष्ट होत. 1987 साली बोडो विद्यार्थी संघटनेच्या स्वतंत्र बोडोलॅंड चळवळीत फूट पडली आणि एक गट सशस्त्र लढ्यात उतरला. त्या काळात काही बंगाली मारले गेले अन्  स्थानिक आणि स्थलांतरीत वादाची ठिणगी पडली

 

त्या वादास वेळीच आवर घालण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यातच 1993 साली झालेल्या हत्याकांडात पन्नासहून अधिकजण मारले गेले. हा वाद धुमसतच राहिला आणि 1994 साली झालेल्या दंगलीत 100हून अधिक जणांचे शिरकाण झाले. यानंतर गेल्या काही वर्षात दंगली, स्फोट,जातीय हिसांचार यानी आसामला धगधगत ठेवण्याचे काम दहशतवाद्यांनी सुरुच ठेवलंय.

 

या सगळ्या आगीत जुलै महिना हा आसामसाठी अतिशय अशांत ठरलाय. काही दिवसापुर्वी दोन मुस्लीम तरुणांची हत्या झाली होती. 15 जुलैला बोडोलॅंड टायगर्सच्या चार तरुणांची हत्या करण्यात आली आणि जातीय दंलीचा आगडोंब उसळला. गेल्या काही वर्षात उल्फा, बोडो संघटनाच्या कारवाया आणि स्थानिकांची होत असलेली घुसमट यामुळे निसर्गाचा हा अनुपम्य प्रदेश आज हिसांचाराच्या वणव्यात होरपळतोय