धोकेबाज पाकिस्तान, टेरर लैला....

सुरजित सिंगच्या कुटूंबावर आनंदाचे वातावरण पसरलय.. आशा संपल्यायत अस वाटत असतानाचं तब्बल तीस वर्षानंतर पाकिस्तानमधून मध्यरात्री एक अचानक आनंदाची बातमी आली..

Updated: Jun 28, 2012, 12:00 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

सुरजीत सुटणार, सरबजीतचे काय?

का फिरवला गेला पाकिस्ताने निर्णय

कुणाला घाबरलं पाकिस्तानचे सरकार ?

पाकिस्तान सरकारचं पुन्हा घुमजाव

 

धोकेबाज पाकिस्तान

 

सुरजित सिंगच्या कुटूंबावर आनंदाचे वातावरण पसरलय.. आशा संपल्यायत अस वाटत असतानाचं तब्बल तीस वर्षानंतर पाकिस्तानमधून मध्यरात्री एक अचानक आनंदाची बातमी आली.. सुरजितच्या सुटकेनं आनंद पसरलाय.. पाकिस्तान जरी या निर्णयाबद्दल जरी स्वताची पाठ थोपटत असलं तरी,  मुळातच सुरजित सिंगची शिक्षा भोगून संपलीय.. हे त्यामागचं खरं वास्तव आहे. पंजाबच्या फिरोजपूर मध्ये सूरजितच्या कुटूंबावर सध्या आनंदाचे वातावरण पसरलय.. तीन वर्षानंतर पाकिस्तानमधून ही आनंदाची बातमी आलीय... सूरजित सिंग.. सूरजित सिंगला 1982 मध्ये  पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती.  पाकिस्तानच्या सरकारने कुठलीही मुलाहिजा न करता सूरजितवर असे काही आरोप रचले गेले आणि सूरजितसिंग जेलच्या कोठडीत त्याची रवानगी झाली.. न्यायालयात खटला चालला  आणि न्यायालयाने सूरजित सिंगला फाशीची शिक्षा ठोठावली... सूरजितसिंगने पाकिस्तान सरकारकडे दयेचा अर्जही केला होता. त्यावेळी सूरजितसिंगचा दया अर्ज फेटाळला गेला होता..

 

त्यानंतर मात्र पुन्हा आशेचा एक किरण पुन्हा उजळला.. 8 डिसेंबर 1988 ला पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रापती गुलाम शहा यानी सूरजितची फाशीच्या शिक्षेवर पुन्हा विचार केला आणि सूरजीत सिंगची फाशिची शिक्षा राष्ट्रपतीनी जन्मठेपेत बदलली.. सूरजीत सिंगच्या कटूंबात आनंदाचे वातावरण पसरलले... पण य़ा आनंदाचा हिरमोड करण्यात पाकिस्तानकडून वारंवार चालढकल केली जायची.. त्याचवेळी पंजाब सरकारने पाकिस्तानला याची जाणीव करुन दिली होती की,  सूरजितची शिक्षा केव्हाच संपलीय.. पण या निर्णयाकडे मात्र पाकिस्तानने पद्धतशीरपणे कानाडोळा केला.. पाकिस्तान सरकार आता म्हणतय, की आम्ही सूरजितला सोडणार, जो निर्णय मुळ होता की सरबजितला सोडणार... लाहोरच्या एकाच जेलमध्ये  सरबजित आणि सूरजित अटकेत आहेत.. सर्वात विशेष म्हणजे, घरात दुखाचे वातावरण असूनही, सरबजितच्या कटूंबियानी सुरजितच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केलाय.. सूरजितच्या परिवारालाही आता आस लागलीय ती सरबजीतच्या सुटकेची.. कारण या दोघांमध्ये नाते आहे ते भारतीयत्वाचे. अखेर बावीस वर्षानंतर आता सरबजीत सुटणार आहे.. पाचवेळा दया अर्ज करुनही तो नाकारण्यात आला.. आणि पाचही वेळा पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर आला.. सुरजित सिंगची सुटका होणार असली तरी सरबजीतची सुटका कधी होणार हा प्रश्न मात्र कायम आहे..

 

सरबजितसिंगची सुटका होणार ही ब्रेकींग न्यूज सर्वप्रथम झळकली  ती भारतीय मिडीयामध्ये नाही तर पाकिस्तानच्या मिडीयामध्ये... भारत ज्याची वारंवार विनवणी करतेय, आणि पाकिस्तान ज्याबद्दल वारंवार हुलकावणी देतेय तो पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या सरबजित सिंगच्या सुटकेची बातमी पाकिस्तानी मिडीयानं जोरदार पसरवली.. आणि यामागे पाकिस्तान सरकारचा जगभरात उदोउदो करण्याचा इरादा होता.. आणि हे करत असताना भारत सरकारने अजमेर जेलमध्ये असणा-या डॉ.खलिल चिश्ती यांच्या सुटकेच्या बदल्यात हा शाही तोहफा असल्याचा बतावणीही करण्यात येत होती. पाकिस्तान मिडीयामधून  सरबजीत सिंगची सुटका केलीय.. पाकिस्तान सरकारची भूमिका ही कायद्याच्या चौकटीतील आहे याचा जगाला पटवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु झाला होता.. एकीकडे भारतात पाकिस्तानचा दहशतवादी अबू जिंदाल सापडला होता तर दूसरीकडे पाकिस्तानचा हा चेहरा सा-या जगाला दाखवायचा होता म्हण