तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.

Updated: Dec 13, 2011, 01:14 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आसपासचं वातावरण, परिस्थिती यातून येणारं नैराश्य हे एक हैराण करणारं वास्तव न उरता ही एक जागतिक समस्या बनत चालली आहे. पाचवी सहावीची मुले पेनकिलर घेऊन झोपतात, त्यांना परिक्षेचा तणावही त्रास देतो. लहानपणापासूनच तणावाच्या वातावरणात मोठं झालेल्या या मुलांना तारुण्यही तेवढंच छळतंय. आज देशात मुलाना नव्वद मिनीटाला एक आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आलीय.. याला कधी कार्टून जबाबदार असतो तर कधी चित्रकलेची परीक्षाही...

 

भारतात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. देशात दर ९० मिनिटाला एक तरुण- तरुणी  आत्महत्येचा प्रयत्न करतेय.तर दर चार तासाला एक तरुण- तरुणी आत्महत्या करत आहे. आज वाढता मानसिक ताणतणाव तरुणाईचा वैरी बनला आहे. देशात तरुणांच्या होणाऱ्या मृत्यूमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आढळून आलं आहे.

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात  वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे..

 

२००० मध्ये २ % तरुण - तरुणींना मानसिक तणावाच्या तक्रारीने घेरलं होतं. गेल्या १० वर्षात मानसिक तणावाच्या प्रमाणात जवळपास ६ पटीने वाढ झालीय. मानसिक ताणतणावाबरोबरच त्यातून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही वाढली असून या समस्येने आता अक्राविक्राळ रुप धारण करण्यास सुरुवात केलीय. गेल्या काही वर्षाची आकडेवारी पहाता २००० मध्ये १ हजार तरुण- तरुणींनी आत्महत्या केली होती. मात्र पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण ६ पट वाढलं आहे. भारता प्रमाणेच जगभरात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणाईचा भरणा अधिक असून ही एक जागतिक समस्या बनत चालली आहे.

 

भारतातल्या काही शहरात हे प्रमाण अक्षरश:हदरवून सोडणारं आहे. आज देशातील १३ टक्के तरुणाई म्हणजे जवळपास ८ कोटी तरुण-तरुणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मानसिकदृष्या अस्वस्थ आहे. जगभरात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी १० टक्के आत्महत्या या एकट्या भारतात होतात. त्यामध्य़े तरुण- तरुणींचा भरणा मोठा आहे. गेल्या दहा वर्षात अशा प्रकरणांमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १५ ते २४ वयोगटातील तरुण - तरुणींची संख्या अधिक आहे.

 

मानसिक ताणतणाव हे त्या आत्महत्येमागचं कारण असल्याचं मानला जातंय.मानसिकदृष्ट्या खचलेल्य़ांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा वारंवार विचार येतो. अशा व्यक्तीची वेळीच दखल घेतली गेली नाही तर त्याचा गंभीर परिणाम  होऊ शकतो. विशेषतः शाळकरी मुलं आणि कॉलेज तरुण- तरुणी मानसिक तणतणावातून मुक्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अभ्यास, परीक्षा, गुण , परिक्षेतील यश अपयशाच्या भीतीमुळे विद्यार्थी तणावाखाली येतात आणि त्यातून अशा घटना घडतात.विद्यार्थ्यांवर पडणाऱ्या ताणतणावांवर विचार करण्याची वेळ आली आहे.