www.24taas.com, मुंबई
भिक्षेका-यांची भिक मागण्याची वृत्ती नाहीसी व्हावी म्हणून भिक्षेकरी गृह उभारण्यात आलेत...पण सोलापूर जिल्ह्यातील केडगावचं कुष्ठधाम जणू नरक बनलंय़...पुढचा आर्धातास आम्ही त्या कुष्ठधाममधील अनेक धक्कादाय घटनांचा तपशीलवर खुलासा प्राईम वॉचमध्ये ...कुष्ठधाम की मृत्यूधाम ?
सोलापूहर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात केडगावचं कुष्ठधाम हे पंचक्रोशीत सर्वांच्या परिचयाचं आहे...भिक्षेकरी सुधारावेत म्हणून इथं भिक्षेक-यांना ठेवलं जातं....पण प्रत्यक्षात इथं जे काही सुरु आहे ते अंगाचा थरकाप उडवणार असं आहे...आमच्या स्टिंग ऑपरेशनमुळे या कुष्ठधाममधलं सत्य जगासमोर आले आहे.
हे आहे सोलापूर जिल्ह्यातील केडगावचं शासकीय कुष्ठधाम...राज्य सरकराने मोठ्या उदात्त हेतून 1964साली हे कुष्ठधाम उभारलं..पण इथं त्या उदात्त हेतूलाच मुठमाती देण्याचा प्रयत्न केला जात आहे....सरकारी अनास्था आणि अधिकारी - कर्मचा-यांच्या मनमानीमुळे हे कुष्ठधाम मृत्यूधाम बनण्याच्या मार्गावर आहे...आमच्या छुप्या कॅमे-याने इथलं भीषण वास्तव कैद केले आहे.
अंगावर काटा आणणारं आहे...
केडगावच्या कुष्ठधामची अवस्था जनावरांच्या गोठ्यालाही लाजवेल अशी आहे...अस्वच्छतेचं साम्राज्य तिथं पसरलं होतं....प्रसाधनगृहाची अवस्थातर अत्यंत वाईट होती...बाहेरची परिस्थितीपाहून आतमधली स्थिती काय असेल याचा अंदाज आम्हाला आला होता...आम्ही आतमध्ये पोहोचलो तेव्हा अंधा-या खोलीत भिक्षेकरी आशाळभूत नजरेनं आमच्याकडं पाहात होते....भूकनं जणू त्यांच्या शरिराचा ताबा घेतला होता...केळी घेण्यासाठी आधाशा सारखे हात प्रत्येकजण पुढे करत होता...ते दृष्य ह्रदय पिळवटून टाकणारं होतं...आम्ही दुस-या खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथही चित्र काही वेगळं नव्हतं..क्षीण झालेल्या शरिराला कपड्यांचंही ओझं वाटावं अशी काहींची अवस्था होती..... काहींच्या कपड्यावर मळाचे थर साचले होते...तर काही अर्धनग्न अवस्थेत बसले होते..आमच्या प्रतिनिधीने एका भिक्षेक-याशी संवाद साधला तेव्हा एकएक धक्कादाय माहिती बाहेर येत गेली....
इथं भिक्षेक-यांना कपड्याचा एकच जोड दिला जातोय....सरकारकडून खाण्यापिण्याच्या वस्तू कागदोपत्री उपलब्ध करुन दिल्या जात असल्या तरी त्या भिक्षेक-यांपर्यंत पोहोचत नसल्याचं एका भिक्षेक-याने सांगितलं. भिक्षेकरी आजारी पडल्यास त्यांच्या उपचारासाठी दवाखाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलीय...पण त्याचीही अवस्था भिक्षेकरीगृहपेक्षा काही वेगळी नाही. भिक्षेक-यांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची व्यवस्था करण्यात आलीय...पण गेल्या अनेक महिन्यांपासून इथला टीव्ही बंद आहे. भिक्षेक-यांसाठी सरकार वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करतंय़...पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचं आमच्या छुप्या कॅमे-यात कैद झालंय....भिक्षेकरीगृहातली भिक्षेक-यांची अवस्था कत्तलखान्यातील जनावरांपेक्षाही भीषण होती...
केडगावच्या कुष्ठधाममध्ये भिक्षेक-यांची काय अवस्था आहे हे आताच आपण बघीतलंय..खरं तर या भिक्षक-यांसाठी 16 अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलीय..पण इथला कारभार एक चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या हातात आहे..
केडगावच्या या कुष्ठधाममधील भिक्षेक-यांची अवस्था अत्यंत बिकट बनलीय..आणि त्याला कारणीभूत आहेत कुष्ठधामचे अधिकारी आणि कर्मचारी. तीनशे भिक्षेक-यांची क्षमता असलेल्या या कुष्ठधाममध्ये आज 121 भिक्षेकरी आहेत...या केंद्रासाठी 25 अधिकारी आणि कर्मचा-यांची सरकारने नियुक्ती केली असून त्यापैकी 16 कार्यरत आहेत.त्यामध्ये डॉक्टर आणि