ऊस दरवाढीनंतर आता कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय.
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर आणि पाचोरा तालुक्यात कापसाच्या हमीभाववाढीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यात भरवसच्या शेतक-यांनी रास्तारोको केलाय. तर पाचोरा शिरसोली रसत्यावर शिवसेनेनं रास्तारोको केला. रस्त्यावर कापूस फेकून शेतक-यांनी आपल्या मागण्या मांडल्या.
यावेळी अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतक-यांनी केलीय.