कसं बुडालं टायटॅनिक?

15 एप्रिल 1912 ची ती घटना.. आज वर्षामागून वर्षे लोटली जातायत.. पण शतकापूर्वीची ती घटना आजही विसरता येत नाही..ती केवळ एका जहाजाची दुर्घटना नव्हती, ती होती कधीही न विसरल्या जाणा-या महाविध्वंसाची आठवण... आजही त्या घटनेनं काळजाचा थरकाप उडतो.... अटलांटिक महासागरामध्ये हजारो प्रवाशांना त्या काळरात्री जलसमाधी मिळाली

Updated: Apr 14, 2012, 11:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ती रात्र.. त्या रात्री आपल्या समोर काय वाढून ठेवलंय याची काळालाच नाही, तर त्या अथांग महासागरालाही कल्पना नव्हती... 14 एप्रिलला रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी टायटॅनिकच्या कॅप्टन्सनी हिमनगाची धडक चुकवली खरी, पण त्यांना जहाजाला वाचवता आलं नाही.... चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सातत्यानं हिमनगाबाबत इशारे मिळत होते. मात्र त्याचं गांभीर्यच जहाजावरील अधिका-यांच्या लक्षात आलं नाही. अधिका-यांच्या या चुकीमुळेच टायटॅनिक नावाचा काळा इतिहास निर्माण झाला....

 

न्यूयॉर्कचा किनारा 400 मैल दूर असताना टेहळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळल्यानंतर ड्युटी ऑफिसरनं टायटॅनिक तत्काळ डावीकडे वळवण्याचे आदेश दिले....बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशाही बदलली आणि जहाजाची हिमनगाशी सरळ धडक टाळण्यात यश मिळालं. मात्र टायटॅनिकच्या उजव्या बाजूचा, पाण्याखाली 20 फूट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेलाच. आणि या भागात झालेल्या भेगांमधून वेगानं पाणी आत शिरू लागलं.

 

आणि इथूनच सुरू झाला समुद्रातला थरार... टायटॅनिकचे तळमजले हळूहळू पाण्यानं भरत होते तसतसा जहाजावर गोंधळ, भीती आणि आक्रोश वाढत होता.... काही वेळातच टायटॅनिकच्या कॅप्टन्सना जहाज वाचू शकणार नसल्याची संपूर्ण कल्पना आली होती. त्यामुळे प्रवाशांना लाइफ बोटींच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले..... पण जहाजात होते त्यापैकी निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील, इतक्याच लाईफ बोटी त्यावेळी उपलब्ध होत्या. आणि त्यातही टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गानं प्रथम दर्जाच्या लोकांना आणि प्रामुख्यानं स्त्रिया आणि मुलांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्यानं, सुरूवातीच्या काही लाईफ बोटी पूर्णपणे न भरताच सोडण्यात आल्या..... अशा बेजबाबदार आणि दुजाभावाच्या वागणुकीमुळे केवळ 706 प्रवाशांचे प्राण वाचवता आले. इतर प्रवासी जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. जहाजावर प्रचंड गोंधळ माजला होता. त्याचवेळी टायटॅनिकचे दोन तुकडे झाले आणि प्रचंड हाहा:कार उडाला. काही प्रवाशांनी भीतीनं अटलांटिक महासागरातच उड्या घेतल्या.... महासागराचं तापमान त्यावेळी उणे दोन अंश सेल्सिअस इतकं होतं. त्यामुळे साधारण पंधरा मिनिटांतच पाण्यात उड्या घेतलेल्या प्रवाशांचाही गारठून मृत्यू झाला.... केवळ अडीच-तीन तासात होत्याचं नव्हतं झांलं..... उरल्या होत्या फक्त वेदना आणि कटू आठवणी..... आणि मनात सलत राहिला तो एकच प्रश्न, का झाला हा अपघात  ?

15 एप्रिल 1912 ची ती घटना.. आज वर्षामागून वर्षे लोटली जातायत.. पण शतकापूर्वीची ती घटना आजही विसरता येत नाही..ती केवळ एका जहाजाची दुर्घटना नव्हती, ती होती कधीही न विसरल्या जाणा-या महाविध्वंसाची आठवण... आजही त्या घटनेनं काळजाचा थरकाप उडतो.... अटलांटिक महासागरामध्ये हजारो प्रवाशांना त्या काळरात्री जलसमाधी मिळाली.... अनेकांची स्वप्नं, इच्छा-आकांक्षाही महासागरात निद्रिस्त झाल्या... टायटॅनिक या सर्वात महाकाय आणि अत्यंत देखण्या जहाजाला शंभर वर्षांपूर्वी जलसमाधी मिळाली. या आलिशान जहाजावर तीन दिवस सागरी सफरीचा मनमुराद आनंद लुटणा-या दीड हजार प्रवाशांवर काळानं झडप घातली. आणि त्यासोबत एक सुंदर स्वप्नही पाण्याखाली गेलं. ते स्वप्न होतं कधीही न बुडणा-या जहाजाचं...

 

इंग्लंडमधील साऊथहॅप्टनमधून हे जहाज आपल्या पहिल्याच सफरीवर न्यूयॉर्कला निघालं होतं. मजल दरमजल करत डौलांनं हे जहाज आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी पाणी कापत निघालं होतं... सगळं काही आलबेल आहे असं वाटत असतानाच, 14 एप्रिलच्या त्या दुर्दैवी रात्री न्यूयॉर्कला पोहोचण्याआधीच काळच हिमनगाच्या रुपानं आडवा आला आणि तो महाभयंकर अपघात झाला. कधीही न बुडणारं जहाज असा दावा ज्याच्याबाबतीत केला जात होता, त्या टायटॅनिकच्या पहिल्याच प्रवासात ठिक-या ठिक-या झाल्या... जहाजाला जलसमाधी मिळून आता शंभर वर्षे पूर्ण झाली असली, तरीही टायटॅनिकनं आपल्या अस्तित्वाचं कुतूहल मात्र कायम राखलंय. ते गूढ अजूनही संपत नाही... काळाच्या लाटा वर्तमानाला पुढे लोटत