मुंबई : राज्यातील शाळांना यापुढे पाच दिवसाचाच आठवडा असणार आहे. हा नियम पहिली ते पाचवीपर्यंत लागू असणार आहे. राज्याच्या शिक्षण सचिवांनी या नियमाला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी तसे लेखी काढलेत.
अभ्यासाच्या आणि शाळेच्या ताणावातून मुलांची सुटका झाली पाहिजे, अशी मागणी लोकभारतीचे अध्यक्ष आणि मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले होते. शनिवार, रविवार दोन दिवसांची सुट्टी मिळावी, अशी मागणीही पाटील यांनी केली होती.
शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानस शास्त्रज्ञांच्या मते आठवडयात किमान दोन दिवस मुलांना सुट्टी देणे आवश्यक आहे. शहरामधील शाळांमध्ये दुरुन येणाऱ्या शिक्षकांवरही प्रवास आणि बदलत्या शिक्षणक्रमाचा ताण पडतो, हे लक्षात घेऊन याकडे लक्ष वेधले होते.
दरम्यान, ही नविन बाब नाही. आधीचाच निर्णय आहे, अशी सारवासारव शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. हा आपला निर्णय नाही, असे स्पष्टीकर तावडे यांनी यानंतर दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.