मुंबई : राज्यातल्या शाळांमध्ये आता आठवीपर्यंत ढकलण्याची परंपरा बंद होण्याची शक्यता आहे. तसेच गुण पद्धत पुन्हा सुरु होणाचे संकेत मिळालेत.
शाळेतली ग्रेड पद्धत बंद करून गुणांची पद्धत सुरू करण्याचीही चिन्ह आहेत. कारण शिक्षणमंत्र्यांच्या उपसमितीने मनुष्य विकास मंत्र्यांसोबतच्या बैठकीत याबाबत शिफारस केली आहे.
तर आठवीपर्यंत सरसकट पास करण्याबाबत नापसंती व्यक्त करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि तामिळनाडूचे शिक्षणमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर शालेय शिक्षणात बदल घडवून आणण्याचे संकेत देण्यात आलेत.