मुंबई : मुंबई विद्यापीठाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. तुम्ही पास व्हा आणि थेट पदवी, पदव्युत्तरसाठी प्रवेश घ्या, असे सोपे धोरण अवलंबिले आहे.
तुम्हाला एवढेच टक्के हवेत, अशी अट आता राहणार नाही. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश द्यायचा टक्क्यांची अटच मुंबई विद्यापीठाने काढून टाकली. त्यामुळे बारावी आणि पदवी परीक्षेत फक्त पास होणे हाच निकष पुढील अॅडमिशनसाठी पुरेसा आहे.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गांना किमान ४० टक्के तर खुल्या प्रवर्गाला किमान ४५ टक्के गुणांची अट होती. आता विद्यार्थी फक्त पास असला तरी त्याला पुढील प्रवेश मिळणार आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला. या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्वत परिषदेनेही मान्यता दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.