सीबीएसई १२ वीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

सीबीएसईच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन) १२वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकला पाहण्यासाठी तुम्ही संकेतस्थळाचा वापर करू शकता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
सीबीएसईच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन) १२वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकला पाहण्यासाठी तुम्ही संकेतस्थळाचा वापर करू शकता.
निकाल पाहण्यासाठी www.results.nic.in, www.cbseresults.nic.in, www.cbse.nic.in या संकेतस्थळांचा वापर करू शकता. तसेच फोनवर निकाल समजण्यासाठी ३० पैसे प्रति मिनिट मोजावे लागतील. त्यासाठी २४३००६९९ (दिल्लीतील स्थानिक) तर ०११-२४३००६९९ (दिल्लीच्या बाहेरील लोकांसाठी) या क्रमांकावर माहिती मिळू शकेल.
एमटीएलच्या ग्राहकांना २८१२७०३० तर दिल्ली बाहेरील ग्राहकांना ०११ – २८१२७०३० हा क्रमांक डायल करून निकाल जाणून घेऊ शकता. तर एसएमएसच्या माध्यमातून निकाल समजू शकेल. त्यासाठी एक रूपया मोजावा लागेल.

सीबीएसई १२ आणि रोल नंबर टाईप करून खालील ऑपरेटर नंबर वर तुम्ही एसएमएस पाठवू शकता. बीएसएनएल ५७७६६, वोडाफोन ५००००,एमटीएस ५४३२१६, टाटा टेली सर्विस ५४३२१, ५१२३४, ५३३३३००, एयरसेल ५८००००१, एयरटेल ५२०७०११
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.