www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदा बारावीच्या परीक्षा सुरळीत होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. कारण ज्यू. कॉलेजच्या शिक्षकांनी १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला असून उद्यापासून राज्यातील ६० हजार शिक्षक परीक्षेचं कोणतही कामकाज करणार नाहीयेत. दरम्यान, ६ फेब्रुवारीपासून १२वीची प्रात्यक्षिकांची परीक्षा सुरु होणार प्राध्यापकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची भूमिका घेतली आहे.
१२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठीचं हॉलतिकीट अद्याप प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हॉलतिकीट देण्यासाठी ३-४ दिवस उशिर झालाय आणि त्यामुळेच १२ विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
३ फेब्रुवारीला सुरु होणारी ही परीक्षा आता ६ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. तर दुसरीकडे ज्युनिअर कॉलेजच्या राज्यातल्या ६० हजार प्राध्यापकांनी या परीक्षांवर आणि परीक्षेच्या कामाकाजावर बहिष्कार टाकल्यानं यंदाही १२ वीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह आहे. गेल्या वर्षी सरकारनं दिलेली आश्वसनं प्रलंबित असल्यामुळे यंदा प्राध्यापकांनी पुन्हा बहिष्काराचं हत्यार उपसलंय... सरकार आणि प्राध्यापक संघटनेच्या वादात विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.