...या खेळाडूला पाहून युवीला आठवतंय बालपण!

भारतातील क्रिकेट संघातून बाहेर गेलेला युवराज बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. पण, एका खेळाडूनं त्याला आपल्या लहानपणीच्या आठवणींत रमण्यास भाग पाडलंय...

Updated: Aug 24, 2013, 05:12 PM IST

www.24taas.com झी मीडिया, चंदिगड
भारतातील क्रिकेट संघातून बाहेर गेलेला युवराज बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. पण, एका खेळाडूनं त्याला आपल्या लहानपणीच्या आठवणींत रमण्यास भाग पाडलंय... आणि हा लहानगा खेळाडू आहे ज्युनिअर सचिन तेंडुलकर म्हणजेच अर्जुन तेंडूलकर...

मुंबईच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघातून बाहेर गेल्याने पुन्हा एकदा संघात प्रवेश मिळवण्यासाठी नेटमध्ये कसून सराव करत असलेल्या अर्जून तेंडुलकरची फलंदाजी पाहून मला आपल्या बालपणीची आठवण येतेय, असं युवीनं म्हटलंय.
युवी हा चंदिगड येथील सेक्टर-१६ मध्ये सराव करत होता त्यामुळे 'अर्जुनला नेटमध्ये सराव करताना बघितले की, मला माझ्या बालपणाच्या आठवणींना उजाळा मिळतो' अशी भावना त्यानं ट्विटरवर व्यक्त केलीय. युरोपचा दौरा आताच पूर्ण करून युवी भारतात परत आला आहे. युरोपला त्याने झहीर खानसोबत खूप सराव केला आहे. २०१५ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता यावे म्हणून हे दोघे मैदानात कसून सराव करत आहेत.
युवराज सिंगला भारतीय संघात परतायचे आहे आणि त्यासाठी आता तो पूर्णपणे सज्ज झाला आहे. युवीला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी अधिक सराव करायचा आहे म्हणून तो सध्या तरी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणार असल्याचे त्याने सांगितलं. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतामध्ये युवा आणि अनुभवी खेळांडूची जोड असणे आवश्यक आहे. २०११ मध्ये युवीच्या संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडू असल्याने जेतेपद जिंकता आले, असं युवराजनं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.