www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
क्रिकेट जगताचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिननं काही दिवसांपूर्वीच क्रिकटला गुडबाय केलं... यावेळी आपले भावनाविवश होऊन आपले अश्रू आवरणंही अनेकांना कठिण गेलं. याच क्रिकेटच्या देवासाठी त्याच्या अनेक फॅन्सनं इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च मारलाय.... होय, आणि त्याचमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला खेळाडू ठरलाय.
सचिनचा सर्वाधिक सर्च होणाऱ्या पहिल्या दहा भारतीय व्यक्तींमध्ये समावेशही झालाय. ही माहिती गूगलनं नुकतीच जाहीर केलीय. तेंडुलकरबरोबरच सर्वाधिक सर्च होणारे खेळाडू म्हणजे मिल्खा सिंग, भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी, अर्जेंटीनाचा फुटबाल टीमचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसी, स्विर्त्झलँडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर, भारताची महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड, वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेल, रविंद्र जडेजा आणि भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांचा समावेश आहे.
‘गुगल इंडिया’द्वारे केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसार या वर्षी भ्रष्टाचारात इंडियन प्रिमियर रेटींग यादीत दुसऱ्या स्थानावर राहिलंय. गुगल इंडियाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल-६ मध्ये रन आणि निकाल जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्चमध्ये रेकॉर्ड तयार झालंय. दूरसंचार कंपनी भारतीय एअरटेलद्वारे बुधवारी प्रदर्शित झालेल्या ‘एअरटेल मोबिट्यूड २०१३’च्या यादीनुसार खेळाडूच्या यादीत सचिन तेंडुलकर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात वरती आहे आणि गेल्या वर्षींच्या तुलनेत डाऊनलोडमध्ये १२४ टक्के वाढ झाली आहे. रॉजर फेडरर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी आणि युवराजला पहिल्या पाचमधून वगळून त्यांची जागा सेरेना विल्यम्स, सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल यांनी घेतलीय.
‘आयपीएल-६’मध्ये फायनलला पोहचलेली टीम राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहूल द्रविड याचा देखील या यादीत पहिल्या पाच जणांमध्ये समावेश आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे, ‘आयपीएल ६’मध्ये स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपात अटक केलेल्या तीन खेळाडूंचा... एस. श्रीसंत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्स टीममधलेच होते आणि त्यावेळी द्रविड या प्रकरणात साक्ष देण्यासाठी तयार झाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.