www.24taas.com, मुंबई
भारतीय टीमला सध्या सलामीच्या जोडीचा प्रश्न चांगलाच सतावतोय. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागला अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत युवा क्रिकेटपटूंनी सिलेक्शन कमिटीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यश मिळवलंय. आता य़ुवा क्रिकेटपटूंमध्ये कोणाची वर्णी टीम इंडियात लागते याकडेच सा-यांच लक्ष असेल.
इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज जसजशी जवळ येतेय तसतसा सलामी जोडीचा प्रश्न आणखी गंभीर होत चाललाय. त्यातच वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरला मात्र काही केल्या सुर गवसलेला नाही. त्यांच्या या निराशाजनक कामगिरीमुळे टेस्टमध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलायला हवी अशी चर्चा भारतीय क्रिकेटविश्वात सुरु झाली आहे.
वीरू-गंभीरच्या फ्लॉप-शोमुळेच सिलेक्शन कमिटीनं पहिल्या प्रॅक्टिसमध्ये जवळपास चार ओपनर्सना संधी दिली होती. यावरुनच सलामी जोडीची चिंता गंभीर आहे तेच दिसून आलंय. ओपनिंगसाठी अनेक युवा चेह-यांची नाव सध्या चर्चा आहेत.
अजिंक्य रहाणे
मुंबईकडून खेळणा-या या बॅट्समनना स्थानिक क्रिकेटमध्ये बॅटिंगच्या जोरावर आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यानं प्रॅक्टिस मॅचमध्ये हाफ सेंच्युरी आणि रेल्वेविरुद्धच्या पहिल्या रणजी मॅचमध्ये सेंच्युरी झळकावत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
अभिनव मुकुंद
स्थानिक क्रिकेटमध्येही मुकुंद आपल्या बॅटची जादू दाखवतोय. टेस्टमध्ये त्याला संधीही मिळाली होती. मात्र, त्याला मिळालेल्य़ा संधीचा फायदा उचलता आला नव्हता. त्याचा फॉर्म पाहाता त्याला पुन्हा संधी मिळाली तर या संधीचा तो निश्चितच फायदा उचलेलं.
शिखर धवन
शिखरनही आपल्या बॅटिंगनं अनेकदा सा-यांच लक्ष वेधून घेतलंय. लग्ना बेडीत अडकल्यामुळे त्यानं पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये सहभाग घेतला नव्हता. मात्र, स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं नेहमीच लौकीकाला साजेशी अशी कामगिरी केलीय.
मुरली विजय
ईराणी ट्रॉफीमध्ये डबल सेंच्युरी ठोकत आपण टेस्टसाठी सज्ज असल्याचं मुरली विजयनं दाखवीन दिलं होतं. बॅकअप ओपनर म्हणून तो अनेकवेळा भारतीय टीमचा सदस्य राहिला होता. मात्र, त्याला संधीच मिळाली नाही. सिलेक्शन कमिटीसमोर पर्याय तर बरेच आहेत आता यामध्ये कोणाची वर्णी मिळते ते पाहण महत्त्वाचं ठरणाऱ आहे.