आज भारत-पाकिस्तान आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान क्रिकेटविश्वातील अव्वल प्रतिस्पर्धी. या दोन्ही टीम्स ज्यावेळी मैदानात उतरतात त्यावेळी केवळ जिंकणं हे एकच लक्ष्य दोन्ही टीम्सच्या क्रिकेटपटूंसमोर असतं.

Updated: Mar 2, 2014, 12:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
भारत आणि पाकिस्तान क्रिकेटविश्वातील अव्वल प्रतिस्पर्धी. या दोन्ही टीम्स ज्यावेळी मैदानात उतरतात त्यावेळी केवळ जिंकणं हे एकच लक्ष्य दोन्ही टीम्सच्या क्रिकेटपटूंसमोर असतं.
आता आशिया कपमध्ये या दोन्ही टीम्समधील घमासान क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
दोन्ही टीम्सनाटुर्नामेंटमध्ये एकेक पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे ही मॅचदोन्ही टीम्ससाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
सांघिक कामगिरी करण्यात भारतीय टीम अपयशी ठरली आहे. कधी बॉलर्स चमकतायत तर कधी बॅट्समन. शिखर धवनला गेल्या मॅचममध्ये सुर गवसलाय. त्यामुळे त्याच्याकडून या मॅचमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
रोहित शर्मा अजूनही फॉर्मसाठी चाचपडतोय. कॅप्टन विराट कोहली आपल्या बॅटची जादू प्रत्येक मॅचमध्ये दाखवतोय.
कोहलीप्रमाणेच इतरही बॅट्समनना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.
रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विन या स्पिनर्सनी लंकेविरुद्ध लौकीकाला साजेशी कामगिरी केली होती. मोहम्मद शमीच्या बॉलिंगमध्येही मॅचगणिक सुधारणा होतेय.
आता बलाढ्य पाकिस्तानवर मात करण्यासाठी टीम इंडियाच्या प्रत्येक क्रिकेटपटूंला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
दुसरीकडे पाकिस्तानच्या टीमला लंकेकडून पराभूत व्हाव लागलं असलं तरी, त्यांची टीम भारताला जोरदार टक्कर देण्यास सज्ज आहे.
शाहिद आफ्रिदीपासून भारताला सावध रहाव लागेल. त्याचप्रमाणे उमर गुल भारतीय बॅट्समनसाठी धोकादायक ठरेल.
सईद अजमलच्या स्पिन बॉलिंगचं आव्हानही भारतीय बॅट्समनना पार कराव लागणार आहे. आता या दोन्ही टीम्समधील बिग फाईट कशी रंगते याकडेच जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.