www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंतसह तिघांना अटक झाली. आणि क्रिकेटविश्व पुन्हा एकदा हादरून गेलं. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा फिक्सिंगची चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये मागील वर्षीच चार खेळाडूंवर फिक्सिंगच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा फिक्सिंगच्या आरोपखाली तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे.
राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना अटक केल्याने राजस्थान रॉयल्सची मालकीण शिल्पा शेट्टी मात्र चांगलीच धास्तावली आहे. ट्विटरवरून तिने त्याबाबत तसं ट्विटही केलं आहे.
`स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आमच्या तीन खेळाडूंना तपासासाठी बोलावल्याचं समजलं आहे. हे ऐकून आम्हांला आश्चर्य वाटलं आहे. सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. आम्ही यासंदर्भात बीसीसीआयच्या संपर्कात आहोत. निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आमचं पूर्ण सहकार्य तपास अधिकाऱ्यांना मिळेल. खेळाचं स्पिरीट कायम राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यात कोणतीही तडजोड राजस्थान रॉयल्स सहन करणार नाही.` असं म्हणत शिल्पा शेट्टीनेही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.