सचिनची विकेट काढणाऱ्या शिलिंगफोर्डच्या खेळण्यावर बंदी!

नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 17, 2013, 11:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय. आंतराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळानं (आयसीसी) संशयास्पद बॉलिंगच्या कारणावरून कारवाई करत शिलिंगफोर्डवर बंदी घातलीय.
वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता तो त्याच्या संशयास्पद बॉलिंग स्टाईलमुळे... गेल्या महिन्यात भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या म्हणजेच सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी सामन्यात शिलिंगफोर्ड आणि सॅम्युअल्सची बॉलिंगची शैली संशयास्पद असल्याचं आढळून आलं होतं. यानंतर सामन्याच्या पंचांनी यासंबंधीचा अहवाल आयसीसीकडे सोपविला. यामध्ये सॅम्युअल्सचा जलद चेंडू आणि शिलिंगफोर्डच्या दुसरा स्पिन बद्दल पंचांनी शंका उपस्थित केली होती. आयसीसीनं चौकशी करून शिलिंगफोर्डवर ही कारवाई केलीय.
‘शिलिंगफोर्ड जोपर्यंत आपल्या गोलंदाजी शैलीत बदल करत नाही तोपर्यंत त्याच्यावर बंदी कायम राहील’ असा निर्णय आयसीसीनं दिलाय. तसंच सॅम्युअल्सची ऑफ ब्रेक गोलंदाजी जरी योग्य असली तरी फास्ट बॉल टाकण्याची त्याची शैली योग्य नाही, असंही आयसीसीनं स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.