www.24taas.com,मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.
सचिन एका बाजूला दमदार शतक करत असताना दुसऱ्या बाजूला वासिम जाफरनेही दिमाखदार शतक केले. या दोघांच्या द्विशतकी भागीदारीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या दिवसअखेर तीन बाद २७२ अशी भक्कम सुरवात केली.
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईचे दोन फलंदाज ३५ रन्सवर आऊट झाले. पण जाफर आणि तेंडुलकर यांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्यच होता हे दाखवून दिलं.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील अपयशामुळे सचिनच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यानंतर सचिनने अचानक निवृत्ती जाहीर केली. सचिन रणजी सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते
सचिनचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले ८०वे शतक झळकावले. सर्वाधिक प्रथम श्रेणी शतकाच्या विक्रमापासून दोन शतके दूर आहे. सुनील गावस्करची ८१ शतके आहेत. गावस्करचा विक्रम मोडण्यासाठी त्याला दोन शतकांची गरज आहे. सचिनचा ३००वा हा रणजी सामना आहे.