www.24taas.com, झी मीडिया, ढाका
आशिया किक्रेट चषक स्पर्धेत एक आगळ्यावेगळ्या विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामनात या विक्रमाची नोंद झाली.
पाकिस्तानचा स्पिनर अब्दुर रहमानने तीन बाऊन्सर बॉल टाकले आणि स्व:तावर बंदीची नामुष्की ओढवून घेतली.
रहमानने बांग्लादेशविरुद्ध सामन्यात ११व्या ओवरमध्ये ३ `नो बॉल` टाकले. पंचाने पहिल्या दोन बॉलला `नो बॉल` दिले.
मात्र रहमानने तिसऱ्या बॉलसुद्धा बाऊन्सर टाकला. पंचानी तिसऱ्या बॉलला पण `नो बॉल` देऊन त्याच्यावर पंचांनी बंदी घेतली.
रहमानचा तीन बाऊन्सर बॉलनंतरची आकडेवारी `०-०-८-०` अशी होती. बांग्लादेश विरुद्ध इंडिया सामन्यामध्ये इंडियांच्या वरुण आरोनने दोनदा बाऊन्सर टाकले आणि त्याच्यावर पंचानी बॅन केले.
याआधीही बाऊन्सर बॉल टाकणारे अजून तीन गोलंदाज आहेत. १३ ऑगस्ट २००६ मध्ये केनियाचा कॉलिन्स ओबुयाची बांग्लादेशविरुद्ध सामन्यात ०-०-५-० आकडेवारी होती.
पाकिस्तानाचा मन्सूर अख्तरने ४ फेब्रुवारी १९८४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात ०-०-१-० आकडेवारी केली होती.
६ जूलै २००० मध्ये झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बॉब्वे सामन्यात वेस्ट इंडीजचा गोलंदाज जिमी एडम्सची ०-०-१-० आकडेवारी केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.