ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडकासाठी नेपाळचा संघ

टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आता नव्याने तिन संघाची भर पडली आहे. आता तर भारताचा शेजारी नेपाळ या देशाची टीम टी-२०साठी पात्र ठरली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये रंगत वाढणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 28, 2013, 11:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अबुधाबी
टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आता नव्याने तिन संघाची भर पडली आहे. आता तर भारताचा शेजारी नेपाळ या देशाची टीम टी-२०साठी पात्र ठरली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये रंगत वाढणार आहे.
अफगाणिस्तान, आयर्लंडपाठोपाठ नेपाळचा संघ २०१४मध्ये बांगलादेशात होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात त्यांनी अखेरच्या चेंडूंवर हाँगकाँगवर मात करून ही कामगिरी केली. आयसीसीच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची नेपाळची ही पहिलीच वेळ आहे.
हाँगकाँगला ८ बाद १४३ धावांत रोखल्यावर नेपाळने विजयाचा यशस्वी पाठलाग केला होता. परंतु रनरेट राखता न आल्याने शेवटच्या षटकांत त्यांना विजयासाठी १३ धावांची आवश्‍यकता होती. यावेळी शरद वेसावकर याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेटला. त्यानंतर फोर मारला. फोर मारल्यानंतर एकेरी धाव निघाली. प्रदीप आयरीने चौथा चेंडू खेळून काढला. पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने धावसंख्या बरोबरीत नेली. मग वेसावकरने एकेरी धाव घेत नेपाळने हाँगकाँगवर विजय मिळविला. त्यामुळे नेपाळ टी-२० विश्‍वकरंडक पात्र ठरला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.