भारताला विजयासाठी १३३ धावांची गरज

मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुस-या इनिंगमध्ये 3 विकेट्स गमावून 75 रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु अजूनही भारताच्या 16 रन्सनं पिछाडीवर आहेत. फिलीप ह्युजेस 51 रन्सवर आणि नाईट वॉचमन 4 रन्सवर नॉटआऊट आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 18, 2013, 03:57 PM IST

www.24taas.com, मोहाली
मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुस-या इनिंगमध्ये 3 विकेट्स गमावून 75 रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु अजूनही भारताच्या 16 रन्सनं पिछाडीवर आहेत. फिलीप ह्युजेस 51 रन्सवर आणि नाईट वॉचमन 4 रन्सवर नॉटआऊट आहेत.
दुस-या इनिंगमध्ये कांगारुंच्या आघाडीच्या बॅट्समनना काहीच कमाल करता आली नाही. भुवनेश्वर कुमारच्या तेज मा-यासमोर कांगारु बॅट्समनच काहीच चालल नाही. आता टेस्टच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाची इनिंग झटपट गुंडाळण्यास भारतीय टीम आतूर असेल. अतिशय रंगतदार अशी ही टेस्टमध्ये टीम इंडियाला जिंकायची असेल तर ऑस्ट्रेलियन टीमला भारतीय टीमला लवकरातलवकर आऊट करावच लागणार आहे.

मोहाली टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताचा डाव ४९९ रन्सवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडे ९१ रन्यची आघाडी आहे.
लंचपर्यंत ३ आऊट ३८४ अशा मजबूत स्थितीत असणा-या भारतीय टीमला कांगारू फास्ट बॉलर्सनी दणका दिला आणि भारताची ७ आऊट ४३१ अशी स्थिती झाली. त्यानंत तळातील खेळाडूंनी फारशी कामगिरी करता आली आली नाही.
दरम्यान भारताने पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियावर माफक ९१ रन्सची आघाडीही घेतली.
टेस्ट करिअरमधील तिसरी सेंच्युरी झळकावणारा मुरली विजय दीडशतक साजरं केल्यानंतर लगेचच आऊट झाला. सचिन तेंडुलकरलाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याला स्मिथने ३७ रन्सवर आऊट केलं. कॅप्टन धोनी, रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतले. आणि भारताचं मोठी आघाडी घेण्याचं स्वप्न भंगलं.
मोहाली टेस्टमध्ये शिखर धवनने १८७ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळत सा-यांची वाहवा मिळवली. डेब्यू टेस्टमध्ये फास्टेट सेंच्युरी झळकावण्याची किमया करणा-या धवनला मात्र डबल सेंच्युरीने हुलकावणी दिली. म्हणूनच धवनसाठी हा स्वप्नवत डेब्यू जरी ठरला असला तरी डबल सेंच्युरीने दिलेली हुलकावणी त्याला आणि त्याच्या चाहत्यांना एक हुरहुरी लावून गेला.

चेतेश्वर पुजारा अवघी एक रन काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पीटर सीडलच्या बॉलिंगवर त्याला अलीम दार यांनी एलबीडब्ल्यू आऊट केलं. मात्र, ऍक्शन रिप्लेमध्ये चेतेश्वर पुजाराच्या बॅटला बॉल लागल्याच स्पष्ट दिसत होतं. तरीही अलीम दार यांनी आपंल बोट वर केलं आणि पुजाराला निराश चेह-यानं पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. पुजारानं हैदराबादमध्ये डबल सेंच्युरी झळकावली होती. तो तुफान फॉर्मातही होता मात्र अंपायर अलीम दार यांच्या चुकीच्या निर्णायमुळे त्याला आपल्या बॅटचा जलवा पुन्हा एकदा दाखवता आला नाही.
मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये ४०८ रन्सवर ऑल आऊट करण्यात टीम इंडियाला अखेर यश आलं. मोहाली टेस्टच्या पहिल्य़ा दिवशी ऑस्ट्रेलियाचं शेपूट झटपट गुंडाळण्यात टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. स्टिव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्क यांनी भारतीय बॉलर्सना सळो की पळो करून सोडलं.
या दोघांनी आठव्या विकेटसाठी ९७ रन्सची पार्टनरशिप केली. स्मिथला अखेर ९२ रन्सवर आऊट करण्यात भारताला यश आलं. मात्र, टीम इंडियाचा आनंद फार काळ टिकला नाही. मिचेल स्टार्क भारतीय बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं ९९ रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आणि नॅथन लिऑननं नवव्या विकेटसाठी ५१ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली.
टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनच्या खेळीमुळे वीरेंद्र सेहवागचं स्थान धोक्यात आलंय. गेल्या ब-याच दिवसांपासून टीम इंडियाच्या ओपनिंगचा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. हा वीरु-गंभीर प्रश्न आतातरी निकालात निघाल्यासारखा दिसतोय. वारंवार संधी मिळूनही धडाकेबाज सेहवाग फेल होत होता. कांगारुंविरुद्ध दुस-या आणि तिस-या टेस्टसाठी त्याला डच्चू देण्यात आला. त्याच्या जागी संधी मिळालेल्या शिखर धवननं पदार्पणाच्या टेस्टमध्येच सेंच्युरी झळकावत सेहवागला कायमचा खो दिलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करत टेस्ट पदार्पणातली सर्वात जलद सेंच्युरी धवननं ठोकली.