मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा भारत `अ` संघाच्या कर्णधारपदी

ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.

Updated: Jun 12, 2014, 12:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.
तिवारी आणि उथप्पा यांच्या एका महिन्यासाठी निवड करण्यात आली आहे. तिवारी चार दिवसांच्या सामन्यांसाठी तर उथप्पाला वनडे टिमचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलिया अ, ऑस्ट्रेलिया हाय परफॉर्मन्स सेंटर आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्या सोबत भारतीय संघाचे एक दिवसीय सामने होणार आहे. या संघात चांगली कामगिरी करणारे आणि आईपीएल 7 मध्ये चांगली कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय.

रणजी सामन्यांत चांगले कामगिरी करणारे एल राहुल, करुण नायर, रेल्वेचा अनुरीत सिंह, तर रजत पालीवाल यांची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा-या सामन्याआधी उमेश यादव आणि अमित मिश्राला चांगली कामगिरी करणा-याची संधी मिळाली आहे.
डावखुरा गोलंदाज प्रग्यान ओझाला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे रणजी सामन्यांत सर्वांधिक 1223 रन्स करणाऱ्या केदार जाधवला चार दिवशीय सामन्यात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, वनडे स्थान दिले आहे.
भारत अ संघ
चार दिवशीय संघ - मनोज तिवारी ( कॅप्टन) के. एल राहुल, जीवनज्योत सिंह, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, करुण नायर, नमन ओझा, प्रग्यान ओझा, उमेश यादव, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंह, रजत पालीवाल, अमित मिश्रा, संदीप शर्मा, जसप्रीत बुमरा, बाबा अपराजित
वनडे संघ-
रॉबिन उथप्पा (कॅप्टन), उन्मुक्त चंद, मनीष पांडे, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, केदार जाधव, संजू सॅमसन, परवेज रसूल, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, रिषी धवन, मोहित शर्मा, कर्ण शर्मा, राहुल शुक्ला, मनन वोहरा, जयदेव उनादकट.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.