'संसदेतही भ्रष्टाचार, मग ते पाप नव्हे का?'

भाजप खासदार आणि माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आयपीएलला `पाप लीग` म्हणणाऱ्यांवर टीका केलीय. आयपएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यावर सोशल वेबसाईट ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सिद्धूनं भाष्य केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2013, 03:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजप खासदार आणि माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आयपीएलला `पाप लीग` म्हणणाऱ्यांवर टीका केलीय. आयपएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यावर सोशल वेबसाईट ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सिद्धूनं भाष्य केलंय.
इतके घोटाळे, भ्रष्टाचार, धोकेबाजीनंतरही संसदेला पवित्र मानलं जातं. मग आयपीएलला पाप लिग का म्हणता, असा सवाल नवज्योतसिंग सिद्धू यांनी विचारलाय.
`पाप लिग` का म्हणता?
राजकारणात इतके घोटाळे, भ्रष्टाचार होत आहेत. पण असं असूनही संसदेला आपण अजूनही `पवित्र`च मानतो! मग असं असताना ‘आयपीएल’ला `पाप लिग` का संबोधता? – नवज्योत सिंग सिद्धू

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.