डॉट बॉल असता तरी जिंकले असते मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना ज्यांनी पाहिला त्यांनी क्रिकेटमध्ये काय होऊ शकते याची प्रचिती आली. या सामन्यात रन्स गौण होते पण सरासरी खूप महत्त्वाची होती.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 27, 2014, 04:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना ज्यांनी पाहिला त्यांनी क्रिकेटमध्ये काय होऊ शकते याची प्रचिती आली. या सामन्यात रन्स गौण होते पण सरासरी खूप महत्त्वाची होती. मुंबई इंडियन्सने १४.३ ओव्हर्समध्ये १८९ रन्स केले. त्यावेळी आणखी एक चेंडू देण्यात आला. पण तो बॉल निर्धाव म्हणजे डॉट जरी गेला असता तरी मुंबई इंडियन्स जिंकले होते.
शेवटच्या चेंडूवर २ धावा काढायच्या होत्या पण त्याचवेळी अंबाती रायडू धावचीत झाला. त्या वेळी नेमके कोण जिंकले, कसे जिंकले याबाबत कोणालाच काही कळत नव्हते. अखेर आदित्य तरेने मारलेल्या षटकारामुळे मुंबई जिंकले.
मुंबई इंडियन्सने १४.३. ओव्हर्समध्ये १८९ रन्स केले. त्या वेळी त्यांची निव्वळ सरासरी 0.078099 अशी होती; तर राजस्थानची सरासरी 0.076821 अशी होती. त्या वेळी मुंबईने हा सामना जिंकला होता; पण धावसंख्या बरोबरीत असल्यामुळे जर विजयी धाव घेण्यासाठी मुंबईने आणखी एक चेंडू घेतला असता, तर त्यांची सरासरी राजस्थानपेक्षा कमी झाली असती. 189वी धाव पूर्ण केल्यानंतर 190वी धाव घेण्याच्या प्रयत्नात रायडू धावचीत झाला; पण आपण पराभूत झालो, या भावनेने निराश होऊन तो काही काळ मैदानात बसून राहिला होता.
कोण जिंकला आणि कसा जिंकला, याबाबत कोणालाच काही उमजत नव्हते. अशा स्थितीत आदित्य तरे मैदानात आला. नॉनस्ट्रायकवर कोरी अँडरसन होता, त्याचवेळी पंचांनी राजस्थानच्या खेळाडूंना सामन्याची नेमकी स्थिती समजावून सांगितली; तर मुंबई इंडियन्स संघातील सपोर्ट स्टाफमधील तज्ज्ञांनी अजूनही आपल्याला जिंकण्याची कशी संधी आहे आणि त्यासाठी पुढच्या चेंडूवर चौकार मारला, तरी आपली सरासरी राजस्थानपेक्षा वरची राहील, याची आकडेवारी तरे आणि अँडरसनपर्यंत पोचविली.
पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी तरे सज्ज होताच फॉक्‌नरने टाकलेल्या फुलटॉस चेंडूवर तरेने षटकारच ठोकला. खरेतर पुढचा चेंडू म्हणजे १४.४ या चेंडूवर एकही धाव मिळाली नसती, तरी मुंबईला जिंकण्याची संधी होती. कारण १४.५ किंवा १४.६ या चेंडूवर चौकारही पुरेसा होता. या दोन्हीही चेंडूवर एकही धाव मिळाली नसती, तर पुढच्या 15.1 या चेंडूवर जिंकण्यासाठी मग मुंबईला षटकाराचीच आवश्यडकता होती.

मुंबई संघाकडे ही आकडेवारी तयार होती; पण फॉक्‌नरने जर 13.4 चेंडू वाइड किंवा नोबॉल टाकला असता तर राजस्थान जिंकले असते; पण तसे त्यांनी-केले नाही आणि विजयापेक्षा खिलाडूवृत्तीला प्राधान्य दिले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.