भारत X न्यूझीलंड : भारतासमोर अखेरची संधी

सलग दोन मॅचेसमध्ये पराभव सहन करावा लागलेल्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये कमबॅकचं मोठं आव्हान असेल. नंबर वनचा ताज गमावल्यानंतर धोनी अॅन्ड कंपनीसमोर सीरिजमध्ये कायम राहण्यासाठी ही अखेरची संधी ठरणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 24, 2014, 09:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सलग दोन मॅचेसमध्ये पराभव सहन करावा लागलेल्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये कमबॅकचं मोठं आव्हान असेल. नंबर वनचा ताज गमावल्यानंतर धोनी अॅन्ड कंपनीसमोर सीरिजमध्ये कायम राहण्यासाठी ही अखेरची संधी ठरणार आहे.
परदेशातील टीम इंडियाची पराभवाची मालिका अजूनही कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाला दोन्ही वन-डेत सपाटून मार खावा लागला. आता तिसऱ्या वन-डेत सीरिजमध्ये आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियासाठी ऑकलंड वन-डे `करो या मरो` ठरणार आहे. भारतीय टीमची कामगिरी उंचावण्यापेक्षा खालावतच चालली आहे. क्रिकेटपटूंचा ढासळता फॉर्मनं धोनीच्या चिंतेत आणखी भर घालणारा ठरला आहे.
विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. त्यानं पहिल्या वन-डेत सेंच्युरी आणि दुसऱ्या वन-डेमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. ऑकलंडमध्येही भारतीय टीमच्या बॅटिंगची त्याच्यावरच असणार आहे. सुरेश रैना चुकांमधून काहीच शिकताना दिसत नाही. तर ओपनिंग जोडीचा प्रश्नही कायम आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. बॉलर्सच्या कामगिरीतही सातत्यही दिसून आलेलं नाही. धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. त्यामुळे या मॅचमध्ये टीममध्ये काही बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. आता टीम इंडिया सीरिजमधील आपलं आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.