www.24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची किमया साधलीय. अखेरच्या दिल्ली टेस्टमध्ये 6 विकेट्सने विजय साकारत धोनी एँड कंपनीने कांगारुंचा बदला घेतलाय. या ऐतिहासिक विजयात भारताच्या स्पिनर्सने महत्त्वाची भूमिका साकारली.
भारताने घेतला कांगारुंचा बदला घेत ऑस्ट्रेलियाला दिला 4-0ने व्हाईटवॉश दिला. हा धोनी एँड कंपनीचा नवा इतिहास ठरला आहे. धोकादायक, उद्धट, गर्विष्ट, कोणालाही भिक न घालणारी आणि माईंड गेम खेळणा-या ऑस्ट्रेलियन टीमचा भारतीय टीमनेच गेम केलाय. ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी मिळालेल्या व्हाईटवॉशचा बदला धोनी एँड कंपनीने घेतला आहे. अखेरच्या दिल्ली टेस्टमध्ये विजय साकारत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 4-0ने व्हाईटवॉश दिला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरलाय. तर ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर टीमवर तब्बल चाळीसहून अधिक वर्षांनी 0-4ने पराभवाची नामुष्की ओढावलीय. अखेरच्या दिल्ली टेस्टच्या तिस-या दिवशी भारतीय बॉलर्सने कांगारुंना केवळ 164 रन्सवर ऑल आऊट केल. यानंतर 155 रन्सच्या विजयाचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने नॉट आऊट 82 रन्सची दमदार खेळी केली. तर 12 रन्सवर नॉट आऊट राहिलेल्या धोनीने विजयी चौकार लगावून भारताच्या या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केल.
दरम्यान या विजयात भारताच्या स्पिनर्सने महत्त्वाची भूमिका साकारली. सीरिजमध्ये सर्वाधिक २९ विकेट्स घेणारा आर. अश्विन `मॅन ऑफ सीरिज`चा मानकरी ठरलाय. तर दिल्ली टेस्टमध्ये ऑल राऊंडर कामगिरी करणा-या रविंद्र जाडेजाला `मॅन ऑफ मॅच`ने गौरवण्यात आलय. भारताचं प्रमुख अस्त्र असलेल्या स्पिनर्सच्या जोरावर भारतात झालेल्या या सीरिजच्या चारही टेस्टमध्ये कांगारुंना शरण यायला भाग पाडत धोनी एँड कंपनीने गर्विष्ट कांगारुंच गर्वहरण केलय.