मोहाली टेस्ट : टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा बॅटींगचा निर्णय

पंजाब क्रिकेट संघ मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजमधली तिसरी मॅच सुरू झालीय. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 15, 2013, 10:19 AM IST

www.24taas.com, मोहाली

पंजाब क्रिकेट संघ मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजमधली तिसरी मॅच सुरू झालीय. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय.

ऑस्ट्रेलियाच्या ओपनर्सनं मैदानावर चांगली सुरूवात केलीय. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्‍या तासात भारताला यश मिळालेलं नाही. डेव्‍हीड वॉर्नर आणि एड कोवान यांनी सावध सुरुवात केलीय. डेव्‍हीड वॉर्नरने स्थिरावल्‍यानंतर काही फटके मारले. इशांत शर्मा आणि भुवनेश्‍वर कुमार निष्‍प्रभ ठरले. कुमारने काही प्रमाणात चांगली गोलंदाजी केली.
पहिला दिवस पाण्‍यात गेल्‍यानंतर आज अखेर तिस-या कसोटीमध्‍ये खेळ सुरु झाला. ऑस्‍ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे कालचा दिवस वाया गेल्‍यामुळे आज अर्धा तास आधी खेळास सुरुवात झाली. गुरुवारी, पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या मोहाली टेस्टच्या पहिल्या दिवशीच खेळ रद्द कऱण्यात आला होता. मोहालीत काल सकाळपासून पाऊस सुरु होता अम्पायर्सनी दुपारी मैदानाची पाहणी केल्यानंतर खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रेलिया टीममधून चार मोठ्या क्रिकेटपटूंच्या गच्छंतीमुळे स्टिव्ह स्मिथ, नॅथन लिऑन आणि झेव्हियर डोहार्टी यांची टीममध्ये वर्णी लागलीय. या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं चेन्नई आणि हैदराबादमध्ये विजय मिळवून २-० अशी आघाडी घेतलेली आहे.