ह्युजची बहीण बॉलर एबॉटकडे जाते तेव्हा..

Updated: Nov 28, 2014, 08:32 PM IST
ह्युजची बहीण बॉलर एबॉटकडे जाते तेव्हा.. title=

 

 

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युजला ज्या बॉलरमुळे प्राण गमवावा लागला त्या बॉलरला जगभरातून समर्थन दिले जात आहेत.
एबॉट या दरम्यान खूप वाईट परिस्थितीतून जात आहे. परंतु गुरुवारी फिलिप ह्युजच्या मृ्त्युनंतर त्याची बहीण मेगण आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टन माइकल क्लार्क यांनी दोघांनाही एबॉटची भेट घेतली आणि त्याला आधार दिला.

ऑस्ट्रेलियन टीमचे डॉक्टर पीटर ब्रुकनर यांनी सांगितले की, गुरुवारी ज्या वेळेस ह्युज जीवन मरणाच्या दारात होता त्यावेळेस एबॉट तेथेच होता. ही दु:खद घटना घडली तेव्हा तो स्वत:ला सावरू शकला नाही. यावेळेस क्लार्क त्याला खूप वेळेस समजवण्याचा प्रयत्न करत होते.

बुधवारी एबॉट सीडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी)ला गेला होता जेथे एबॉटचा चेंडू लागल्याने ह्युजचं निधन झालं. त्यादरम्यान टीमचे खेळाडू आणि अन्य अधिकारी त्याचासोबत तेथे होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.