www.24taas.com, मुंबई
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग याची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ चांगलीच घसरली आहे, त्यामुळे धोनीची पाच कंपन्यांनी जवळजवळ हकालपट्टी केलेली आहे. धोनी त्यांना आता नको असल्याचं समोर येतं आहे. इंग्लंडकडून झालेल्या जबरदस्त पराभवाने संघाची परिस्थिती जैसे थीच राहिली, शिवाय खेळाडूंचा जाहिरातीतील भावदेखील घसरला आहे.
महेंद्रसिंग धोनीची व्हॅल्यू ३० टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. धोनीच्या जाहिराती २८ हून २२ पर्यंत खाली आल्या आहेत. हिंदुस्थानी संघाला २-१ च्या फरकाने लोळवत इंग्लंडने टीम इंडियाला घरात घुसून मारले. या पराभवामुळे देशातील क्रिकेटप्रेमींची चांगलीच नाराजी झाली.
त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्र जाहिरातींच्या बाबतीत पावले जरा जपूनच टाकत आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या जाहिरातींवर चांगलेच गंडांतर आले. जानेवारीत धोनीच्या जाहिरातींची संख्या २८ होती, पण इंग्लंड पराभवानंतर हा आकडा २२ पर्यंत खाली आला. धोनीच्या नावावर ४३ ब्रॅण्ड विकले जायचे, पण या पराभवामुळे १५ ब्रॅण्डस्ने त्याची साथ नाकारली आहे.