www.24taas.com, झी मीडिया, पोर्ट ऑफ स्पेन
भारतीय संघ अखेर पोहोचलाय फायनलमध्ये. सध्या सुरु असलेल्या त्रिकोणी मालिकेतील साखळी सामन्यांत भारताचे नेतृत्व विराट कोहलीने सुंदररित्या केले. या मालिकेतील पहिल्याच सामन्यामध्ये दुखापत झाल्यानंतर कर्णधार धोनी हा या साखळी सामन्यात खेळला नव्हता. पण आता तो अखेरच्या सामन्यात भारताची धुरा वाहण्यास सज्ज झाला आहे.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने बाजी माऱली. त्यामुळेच आता होणाऱ्या फायनलमध्ये भारत श्रीलंकेबरोबर खेळणार आहे.
साखळी सामन्यांमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या तीनही संघानी प्रत्येकी दोन दोन सामने जिंकले. पण, त्यातील भारत आणि श्रीलंका या दोन्हीही संघांनी बोनस पॉईंट मिळवून बाजी मारली आहे. तर आता होणाऱ्या फायनलमध्ये भारतीय संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी धोनीच्या अंगावर पुन्हा असणार आहे. आता तब्येत बरी असल्याने फायनल धोनी खेळणार असल्याचे विराटने स्वत: सांगितले आहे.
उद्या स्पेनमध्ये होणारी ही फायनल भारत विरोधी श्रीलंका असणार आहे. पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर आता शेवटच्या सामन्यात धोनी पुन्हा खेळणार आहे. त्यामुळेच आता इतक्या गॅपनंतर खेळणार असल्यामुळ् भारतीय संघाबरोबर धोनीचीही आता कसोटी लागणार आहे. साखळी सामन्यांत आपले वास्तव्य कायम राखणाऱ्या दोन्ही संघांमधील होणारी ही फायनल अगदी रोमांचक असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.