www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बांगला देशातील मीरपूर येथे झालेल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत पराभूत झाला, याचं कारण युवराज असल्याचं म्हटलं जात आहे.
सामना संपल्यापासून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवर युवीवर टीम इंडियाच्या फॅन्सकडून टीकास्त्र सोडले जात आहेत.
टीम इंडियाकडे बॅटिंग ऑर्डर मोठी असतांना युवराजने 21 चेंडूत रडतखडत 11 धावा काढल्या, आणि दुसऱ्यांदा ट्वेण्टी-२० विश्वचषक जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं.
मात्र कॅप्टन कूल धोनी आणि हरभजन सिंहला युवराजमुळे पराभव झाला हे मान्य नाही, हरभजन आणि धोनीने युवीची पाठराखण केली आहे.
तब्बल २१ चेंडूत फक्त ११ धावांची युवराजची खेळी भारताला महाग पडली आणि दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं.
पण, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्या संघातून बाहेर असलेल्या हरभजन सिंगने मात्र युवराजचा बचाव केला आहे.
`युवीसाठी आजचा दिवस चांगला नव्हता. युवी आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्नात होता, मात्र मैदानात उतरताच फोर-सिक्स मारणं तसं सोपं नसतं,` असं धोनीनं स्पष्ट केलं आहे.
धोनीनंतर सध्या संघाबाहेर असलेल्या ऑफ स्पिनर हरभजन सिंह यानेही युवराजची पाठराखण केली आहे.
तसेच भज्जीने क्रिकेटचाहत्यांच्या युवीवरील अशा प्रतिक्रिया दुर्देवी असल्याचं म्हटलंय, आणि भज्जीने आठवण करून दिली आहे, `विसरु नका, युवीसारख्या खेळाडूने दोन वेळा भारताला विश्वचषक जिंकून दिलाय`.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.