www.24taas.com, झी मीडिया, सिडनी
क्रिकेटला आपलं सर्वस्व मानून खेळणारे क्रिकेटर्स निवृत्तीनंतर निराशेच्या गर्तेत अडकतात, असं नुकतंच एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. ऑस्ट्रेलियाच्या रिटायर्ड क्रिकेटर्सवर केल्या गेलेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आलीय.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर संघातर्फे केल्या गेलेल्या या सर्व्हेमध्ये २००५ नंतर आंतरराष्ट्रीय किंवा राज्य स्तरीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या किंवा संन्यास घ्यायला भाग पाडलेल्या काही क्रिकेटर्सशी संपर्क साधला गेला.
यामध्ये, ३९ टक्के खेळाडून निवृत्तीनंतर दोन आठवड्यांपर्यंत तणाव आणि चिंतेत असलेले आढळले. तर दोन आठवड्यांनंतर २५ टक्के निराशेच्या गर्तेत गेले तसचं ४३ टक्के खेळाडूंना क्रिकेटपासून नातं तोडल्यानंतर आपलं अस्तित्वच संपलं, असं वाटत होतं.
एसीएचे मुख्य कार्यकारी पाल मार्श यांनी सिडनी मॉर्निंग हेरॉल्डशी बोलाताना, ‘निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या खेळाडूंना मदतीची आवश्यकता असते कारण त्यांच्यासाठी हा आयुष्यातील सर्वात कठिण काळ असतो’ असं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.