भारत X द. आफ्रिका : रोमहर्षक जोहान्सबर्ग टेस्ट ड्रॉ...

रोमहर्षक जोहान्सबर्ग टेस्ट मॅच ड्रॉ झाली. भारतानं या मॅचमध्ये सीरिजमध्ये आघाडी घेण्याची नामी संधी गमावली. फाफ ड्यूप्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांनी झुंजार सेंच्युरी झळकावत आफ्रिकेचा पराभव टाळला तर जिंकण्याची संधी असूनही भारतीय टीमला ड्रॉवर समाधान मानाव लागलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 22, 2013, 11:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
रोमहर्षक जोहान्सबर्ग टेस्ट मॅच ड्रॉ झाली. भारतानं या मॅचमध्ये सीरिजमध्ये आघाडी घेण्याची नामी संधी गमावली. फाफ ड्यूप्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांनी झुंजार सेंच्युरी झळकावत आफ्रिकेचा पराभव टाळला तर जिंकण्याची संधी असूनही भारतीय टीमला ड्रॉवर समाधान मानाव लागलं.
शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून धरायला लागलेली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग टेस्ट मॅच अखेर ड्रॉ झाली. भारतीय टीमच्या हातातोंडाशी आलेला विजय आफ्रिकन टीमनं अक्षरक्ष: हिरावून घेतला. भारतीय बॉलर्स आफ्रिकेला ऑलआऊट करण्यात सपशेल अपयशी ठरली. ज्या मॅचवर भारतीय टीमची पकड मजबूत होती. ती मॅच गमावण्याची वेळ धोनी ब्रिगेडवर आली होती. अखेरच्या काही ओव्हर्समध्य़े भारताला आफ्रिकेच्या विकेट्स घेण्यात यश आलं. या विकेट्स घेता आल्या नसत्या तर भारतीय टीमचा पराभव अटळ होता.
भारतानं ठेवलेल्या ४५८ रन्सचा पाठलाग करतांना आफ्रिकेच्या चार विकेट्स झटपट घेण्यात भारतीय टीमला यश आलं होतं. मात्र, एबी डिव्हिलियर्स आणि फाफ ड्युप्लेसिस ही जोडी मैदानावर चांगलीच जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०५ रन्सची पार्टनरशिप केली. याच पार्टनरशिपमुळे भारतीय टीम पराभवाच्या छायेत सापडली होती. फाफ ड्यप्लेसिसनं १३४ रन्सची तर डिव्हिलियर्सनं १०३ रन्सची झुंजार इनिंग खेळली. भारताकडून मोहम्मद शमीनं दुस-या इनिंगमध्ये सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर झहीर खाननं एक विकेट घेत टेस्टमध्ये ३०० विकेट्सला गवसणी घातली. पहिल्या इनिंगमध्ये ११९ रन्स आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ९६ रन्स करणाऱ्या विराट कोहलीला ‘मॅन ऑफ द मॅच’च्या किताबानं गौरविण्यात आलं. भारताला ही टेस्ट मॅच कशीबशी ड्रॉ करण्यात यश आलं. आता दुसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या चुका सुधारत टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.