www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय टीमचा युवा टेस्ट प्लेअर चेतेश्वर पुजाराला आयसीसीचा एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. पुजारानं टेस्टमध्ये धडाकेबाज बॅटिंगनं आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळेच त्याला आय़सीसीचा पुरस्कार मिळाला आहे.
पुजारानं टेस्टमध्ये धडाकेबाज बॅटिंग करत आपली वेगळी छाप सोडली. त्यामुळेच त्याला आय़सीसीनं सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारा. भारतीय टीमच्या यंगिस्तानचा आणखी एक युवा चेहरा. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपतेय. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वी पुजाराचा आत्मविश्वास वाढवणारी एक चांगली घटना घडली आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्याला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर झाला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं खो-यानं रन्स केले आहेत. त्याचप्रमाणे टेस्टमध्ये फास्टेट एक हजार रन्स करणा-या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये त्यानं दुसरा क्रमांकही पटकावला होता. आयसीसीनं याची दखल घेत त्याला एमर्जिंग क्रिकेटरचा पुरस्कार जाहीर केला.
चेतेश्वर पुजारानं १५ टेस्टमध्ये ६५.५० च्या सरासरीनं १३१० रन्स केले आहेत. यामध्ये त्यानं ५ सेंच्युरीज झळकावल्या आहेत. त्याचप्रमाणे नॉटआऊट २०६ रन्स ही त्याची टेस्टमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
द वॉल अर्थातच राहुल द्रविडनं टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर चेतेश्वर पुजाराकडे द्रविडचा वारसदार म्हणून पाहिलं जातंय. पुजारानं आपल्या जबरदस्त टेक्निकच्या जोरावर सा-यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. भारतासाठी टेस्टमध्ये द्रविडनंतर नंबर तीनवर तोच योग्य क्रिकेटर असल्याचं बोललं जातंय.
आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात त्याला भारतीय टीमची एक बाजू लावून धरावी लागणार आहे. आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर त्याची कसोटी लागणार ही बाबही नाकारता येणार नाही. आता आफ्रिकेमधील कठीण परीक्षेत तो पास होतो का ते पाहण महत्वाच ठरणार आहे.
दरम्यान, टेस्ट सीरिजपूर्वी जाहीर झालेला आयसीसीचा पुरस्कार पुजाराचा आत्मविश्वास दुणावणार ठरणार आहे. आता मायदेशात ज्याप्रमाणे पुजाराच्या बॅटची जादू चालली. त्याचप्रमाणे आफ्रिकेतही त्यानं आपल्या बॅटची कमाल दाखवावी अशी आशा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.