www.24taas.com नवी दिल्ली
भारताचा जलद गती गोलंदाज आशिष नेहारा याची आयपीएलच्या सहाव्या सत्रात दिल्ली डेयरडेव्हील्ससाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. यावेळी निवड समितीकडून रॉस टेलरशी आदला बदली करण्यात आली होती. आशिष नेहरा आयपीएलच्या मागील सत्रात पुणे वॉरियर्स संघातर्फे खेळला होता.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात नेहरा मुंबई इंडीयन्सक़डून खेळला होता. त्यानंतर २००९ आणि २०१० मध्ये तो दिल्ही डेयरडेविल्समध्ये होता तर २०११ला झालेल्या लिलावादरम्यान तो पुणे वॉरियर्स संघातर्फे खेळला. जी.एम.आर.स्पोर्ट्सचे प्रमुख टी ए शेखर यांनी सांगितलं की २०१३ च्या आयपीएलमध्ये गोलंदाजीची सर्वत महत्वाची जबाबदारी आशिषच्या खांद्यावर असणार आहे. आमचा संघ २०१२ चा यशस्वी संघ ठरला होता. त्याचप्रमाणे याही वर्षी आमचा संघ चांगली कामगिरी करेल असा माझा विश्वास आहे.
पुणे वॉरियर्स ही रॉस टेलरची चैथी टीम असणार आहे. तो पहिल्या तीन सत्रांदरम्यान राजस्थान रॉयल्स, रॉयल चैलेंजर बॉंग्लोर आणि दिल्ली डेरडेव्हिल्स या संघांसाठी एक एक सत्रातून खेळला होता.
चालू सत्रासाठी नेहराप्रमाणेच मुंबई इंडीयन्सच्या टी. सुमनही मुंबई इंडियन्स दुसऱ्या संघात गेला आहे. टी. सुमन यापुढे पुणे वॉरीयर्ससाठी खेळणार आहे.