www.24taas.com, शिर्डी
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्यावतीनं सत्कार करण्यात आला.
सचिन तेंडुलकरच्या सांगण्यानुसार शिर्डीत आल्याचं रणतुंगानं सांगितलं. सचिननं कसोटी क्रिकेट खेळत राहीलं पाहीजं, असं मत त्यानं व्यक्त केलं. श्रीलंकन टिमच्या खराब प्रदर्शनाविषयी बोलताना त्यानं श्रीलंकन क्रिकेटमध्ये होत असलेल्या सरकारच्या हस्तक्षेपावर टिका केली.
टिम निवडताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याची कबुली रणतुंगा यानं दिली. अर्जुन रणतुंगा हा श्रीलंका क्रिकेट टीमच्या माजी यशस्वी कप्तनांपैकी एक मानला जातो. १९९६ सालचा वर्ल्ड कपही श्रीलंकेने रणतुंगाच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.