www.24taas.com, पुणे
कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पदावरून काढण्याची मागणी वाढत असताना माजी निवड समिती सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. धोनी टेस्ट क्रिकेटमध्ये खेळायला लायक नसून त्यामुळे इतर विकेटकिपरचा भारतीय संघात प्रवेश होऊ शकत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार मोहिंदर अमरनाथ म्हणाले, धोनी कोण आहे की तो सांगतो की मला संघात राहायचं आहे. तसेच कर्णधारपदाची मला जबाबदारी उचलायची आहे. त्याने काय केले आहे. की त्याला कर्णधारपदी कायम ठेवावे. धोनीने कोलकतामध्ये इंग्लडकडून पानीपत झाले तरी कर्णधारपद सोडण्यास नकार दिला आहे. त्यावर टीका करताना मोहिंदर अमरनाथ बोलत होते.
भारतीय संघात समाविष्ट होण्याचा धोनीला अधिकार नाही. देशात आणखी चांगले विकेटकिपर फलंदाज आहेत. त्यांना संघात स्थान मिळत नाही कारण धोनी कर्णधार आहे. माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर आणि श्रीकांत यांचाही धोनीचा संघातील सहभागबद्दल ही भूमिका आहे.
गेल्या वर्षी भारताला मिळालेला विश्व चषक हे एकमेव कारण आहे, ज्यामुळे धोनीकडे कर्णधारपद आहे.