www.24taas.com, वृत्तसंस्था, ढाका
आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे नजम सेठी यांनी ही माहिती दिलीय. सेठी टी-२० वर्ल्डकप बघण्यासाठी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी बांग्लादेशला गेले होते.
पाकिस्तानला टी-२० वर्ल्डकपनंतर ऑक्टोबरपर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय मॅच खेळायची नाहीय. त्यामुळं यादरम्यान भारतासोबत वनडे सीरिज खेळवली जावी असं सेठी यांचं म्हणणं आहे.
२००९नंतर इतर क्रिकेट टीमनं पाकिस्तानात क्रिकेट खेळायला नकार दिला होता. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दरवर्षी १ कोटी डॉलरचं नुकसान सहन करावं लागतंय. या नुकसानाची भरपाई करावी म्हणून टी-२० सूपर लीगचं पाकिस्तान आयोजन करेल, असंही सेठी म्हणाले. अमीरात इथं ही सीरिज खेळवली जाईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.