तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर

दुस-या टेस्टमध्ये इंग्लंडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाच्या तिस-या कसोटीसाठी खेळाडूंची नावे जाहीर कण्यात आलीय. तिस-या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फारसा बदल केलेला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 27, 2012, 01:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
दुस-या टेस्टमध्ये इंग्लंडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाच्या तिस-या कसोटीसाठी खेळाडूंची नावे जाहीर कण्यात आलीय. तिस-या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फारसा बदल केलेला नाही.
मुंबईत निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत नव्या टीमची घोषणा करण्यात आली. या टीममध्ये दुखापतग्रस्त उमेश यादव यांच्या ठिकाणी अशोक दिंडाला स्थान देण्यात आले आहे. सचिन आणि हरभजन सिंगला विश्रांती देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तसे काही झालेले नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना कोलकाता येथील इडन गार्डनवर पाच डिसेंबरपासून सुरु होत आहे. कसोटीमध्ये दोन्ही संघानी एक एक सामना जिंकल्याने मालिकेत बरोबरी साधली गेली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत कोण बाजी मारतो याकडे लक्ष आहे.
संघ खालील प्रमाणे
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, युवराज सिंग, आर. अश्विन, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, इशांत शर्मा, एम विजय, जहीर खान