भारताचा पराभव, विंडीजनं मालिकेत साधली बरोबरी!

विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 24, 2013, 11:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, विशाखापट्टनम
विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.
शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या मॅचममध्ये अखेर विंडीजनं बाजी मारली. कॅप्टन डॅरेन सॅमी विंडीजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह विंडीजनं तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये १-१ नं बरोबरी साधली.
डॅरेन सॅमनी नॉटआऊट ६३ रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. भारतानं विराट कोहलीच्या ९९ रन्सच्या जोरावर २८९ रन्सचं टार्गेट विंडीजसमोर ठेवलं होतं. अवघ्या एका धावेनं विराटची सेन्चुरी हुकल्यानं भारतीय चाहते थोडे फार का होईना, पण नाराज झाले. वेस्ट इंडिजला सिमॉन्सच्या ६२ रन्सच्या आणि सॅमीच्या नॉटआऊट ६३ रन्सच्या महत्वपूर्ण इनिंगमुळे भारतावर मात करण्यात यश आलं. आता कानपूरमध्ये तिसरी आणि अंतिम लढत होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.