बाळाचा विचार केला नाही- करिना

मी सध्या केवळ ३२ वर्षांची आहे. त्यामुळे सध्या तरी बाळाचा विचार मी आणि सैफने केलेला नसल्याचे करिना कपूर हिने सांगितले. लग्नानंतर प्रथमच ती एका सॉफ्टड्रिंकच्या प्रमोशनसाठी चंडीगडला आली होती.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 20, 2012, 11:32 PM IST

www.24taas.com, चंडीगड
मी सध्या केवळ ३२ वर्षांची आहे. त्यामुळे सध्या तरी बाळाचा विचार मी आणि सैफने केलेला नसल्याचे करिना कपूर हिने सांगितले. लग्नानंतर प्रथमच ती एका सॉफ्टड्रिंकच्या प्रमोशनसाठी चंडीगडला आली होती.
ती म्हणाली, लग्नानंतर मी खूप खूष आहे. आता लग्नासंबंधीच्या प्रश्नांतून माझी सुटका झाली आहे. आता मला लग्न कधी करणार आहे हे कोणी विचारणार नाही. मात्र, लग्नानंतर बाळाबद्दल काय, या प्रश्नाचे मला भय वाटते. त्यामुळे कोणी विचारण्यापूर्वीच मी सांगते की, मी सध्या केवळ ३२ वर्षांची आहे. त्यामुळे सध्या तरी बाळाचा विचार मी आणि सैफने केलेला नाही.
करीनाने यावेळी मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. करीना कपूर खान झाल्यानंतर आयुष्यात किती बदल झाला या प्रश्नावर उत्तर देताना ती बोलत होती.
करिना यावेळी सैफबरोबरच्या साडे पाच वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशीप विषयीसुद्धा बोलली करीना म्हणाली, ``मी आणि सैफने आमचे रिलेशन कधीच जगापासून लपवून ठेवले नाही. सुरुवातीला काही काळ सोबत राहायचे आणि त्यानंतर लग्नाचा विचार करायचा हे आम्ही आधीच ठरवले होते. मला जे योग्य वाटतं तेच मी करत असते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x