लग्नापूर्वीच गरोदर होती वीणा मलिक...

आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2014, 12:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय. यावेळेस वीणाबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, वीणा लग्नापूर्वीच गरोदर होती. हा खुलासा केलाय तो मुंबईत राहणारा वीणाचा माजी प्रियकर प्रशांत सिंह यानं...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांतनं पोलिसांसमोर हा खुलासा केलाय. त्यानं वीणा मलिकविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करताना ही माहिती दिलीय. बिझनेसमन असद बशीर खान याच्याशी विवाह करण्यापूर्वीच वीणा प्रशांतच्या बाळाची आई बनणार होती... २०१२ साली वीणा मलिक गरोदर राहिली होती परंतु, त्यावेळेस दोघंही बाळाच्या आगमनासाठी तयार नव्हते... त्यामुळे वीणानं गर्भपात करवून घेतला होता, असं प्रशांतनं पोलिसांसमोर म्हटलंय.
वीणाच्या लग्नाच्या बातमीनंतर अचानक प्रशांत सिंह मीडियासमोर आला आणि त्यानं आपण वीणा मलिक हिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं. सोबतच मीडियामध्ये आणि पोलिसांमध्ये न जाण्याविषयी वीणानं आपल्याला धमकावल्याचाही आरोप प्रशांतनं यावेळी केला होता.
दरम्यान, प्रशांत आपला प्रियकर असल्याचं वीणानं साफ धुडकावून लावलंय. प्रशांत याच्या म्हणण्यानुसार, वीणानं आपल्या लिव्ह इन रिलेशन जगजाहीर करण्यास मनाई केली होती. सध्या, विणानं दुबईतील बिझनेसमन असद बशीर खान याच्यासोबत लग्न केलंय. वीणानं ज्या घाईघाईनं असदशी विवाह रचला त्यामुळे तिचे चाहते मात्र बुचकळ्यात पडलेत. वीणाच्या चाहत्यांच्या मते, वीणा ही खूप महत्त्वकांक्षी आहे... करिअर तिची प्राथमिकता आहे... अशात तिनं इतक्या घाईघाईनं लग्न उरकणं आश्चर्यच आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.