www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
अभिनेता हृतिक रोशनला डिस्चार्ज देण्यात आला आणि हॉस्पीटल बाहेर येताच आपल्या चाहत्यांना हात दाखवत आता आपण बरे असल्याचं त्याने चेह-यानेच सांगितलं.यावेळी हृतिकसोबत त्य़ाचे वडिल अर्थातच निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन होते.
७ जुलैला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृतिकवर यशस्वीपणे ब्रेन सर्जरी करण्यात आली होती.फुकेट येथे शुटिंग दरम्यान स्टंट्स करत असताना हृतिकच्या डोक्याला जखम झाली.. त्यानंतर त्याचं डोकं दुखू लागलं.
दरम्यान, शुटिंग संपवून भारतात परतल्यानंतरही डोकंदुखी सुरुच होती आणि म्हणूनच एमआरआय करण्यात आला.
त्याचदरम्यान त्याच्या मेंदूत गाठ असल्याचं आढळून आलं होतं..मात्र आता शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आल्यामुळे हृतिक पुन्हा एकदा आपल्या सिनेमांचं शूटींग पूर्ण करू शकणार आहे. मात्र जवळपास एक महिना त्याला विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. विशेष म्हणजे ही सर्जरी करण्याआधी हृतिकनं उत्तराखंड पूर ग्रस्तांसाठी २५ लाखांची मदतही केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.